देश दुनिया

देशात १८२३ नवे कोरोना रुग्ण, २४ तासात ६७ मृत्यू

देशभरात १८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे. यापैकी ८ हजार २७३ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन १ हजार ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही […]

देश दुनिया

पंतप्रधान मोदींकडून स्वामित्व योजनेची घोषणा

कोरोनाच्या संकटाने देशासमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. त्याच पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व ग्रामपंचायतीच्या प्रमुखांना संबोधित केले. पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी नवीन ई-गाव स्वराज पोर्टल आणि अ‍ॅप लाँच केले. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा प्रश्न, त्यासंबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजनेचीही घोषणा केली आहे. पंतप्रधान म्हणाले की, […]

देश दुनिया

डॉक्टरांवर हल्ला केल्यास कठोर शिक्षा

देशात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना डॉक्टर, नर्सेसवर होत असलेले हल्ल्यांची दखल घेत केंद्र सरकारने त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेत अध्यादेश जारी केला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत साथीच्या आजाराबाबतचा सन १८९१ च्या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाने डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलीय. देशात करोनाचा उद्रेक झालेला […]

देश दुनिया

चिनच्या रॅपिड टेस्टिंग किटस्वर बंदीचे आदेश

राज्यांना देण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा उपयोग रोखण्याची सूचना आयसीएमआरने केली आहे. काही राज्यांमध्ये हे टेस्टिंग किट फोल ठरत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांनंतर या संदर्भात नव्याने दिशानिर्देश जारी करण्यात येतील, अशी माहिती आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. महाराष्ट्रात आरोग्य विभागाकडून हॉटस्पॉट भागांमध्ये ७५ हजारांवर अधिक रॅपिड टेस्ट करण्यात […]

देश दुनिया

एकाच दिवशी ७०५ रूग्णांनी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली (मवृसे) देशात करोना अत्यंत वेगाने आपले हाय-पाय पसरतो. आत्तापर्यंत देशात १८६०१ करोनाबाधित रुग्ण आढळले. दिलासादायक म्हणजे, आत्तापर्यंत ३२५२ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. केवळ सोमवारी एकाच दिवशी तब्बल ७०५ रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतलेत. हा देशातील आत्तापर्यंतच सर्वात मोठा आकडा आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनामुक्त होणाèया व्यक्तींच्या संख्येतही वाढ होताना दिसतेय, ही सकारात्मक […]

देश दुनिया

कोरोनाःचार राज्यांमधील स्थिती गंभीर

लॉकडाऊनच्या नियमांचे काही राज्यांमध्ये उल्लंघन होत असून केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. तसंच काही राज्यांमध्ये करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये रुग्ण वाढत असल्याने त्या राज्यांच्या सहकार्यासाठी केंद्राने पथके पाठवली आहेत. ही पथके राज्यांना उपयायोजना आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात मार्गदर्शन करतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले. यानुसार महाराष्ट्रातही केंद्राचे पथक दाखल झाले आहे. […]

देश दुनिया

रेल्वे, विमानसेवाही बंद राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम सर्वांंना पाळायचे आहेत. या काळात रेल्वे आणि विमान सेवा सुरू होणार नाही, असे सांगतानाच सर्वांना लॉकडाऊनचे नियम पाळायचेच आहे. घरातच सर्वांना थांबायचे आहे. गरज असेल तरच मास्क लावून घराबाहेर पडा. आपल्याला करोना विरोधात लढायचे आहे आणि हे युद्ध जिंकायचेच […]

देश दुनिया

भारतात कोरोना रूग्णांची संख्या १२ हजारावर

भारतात कोरोना रुग्णांची संख्या ११ हजार ९३३ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत ३९२ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. यापैकी १३४४ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. तर १० हजार १९७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशभरात लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही घोषणा केली. लॉकडाउनचे नियम आणखी कठोर होणार असल्याचेही पंतप्रधान […]

देश दुनिया

देशातील लॉकडाऊन आता ३ मे पर्यंत

मुंबई (मवृसे)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करताना देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला आहे. देशातील करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच करोनाला पराभूत करण्यासाठी केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या सर्वांवर बारकाईने लक्ष देत आहे. करोनाला कुठल्याही परिस्थितीत हरवायचे आहे. यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. अमेरिका, […]

देश दुनिया

नरेंद्र मोदींचे आज देशाला संबोधन

नवी दिल्ली (मवृसे) विविध राज्यांनी अगोदरच लॉकडाऊन वाढवल्यानंतर आता केंद्र सरकारही लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. कदाचित यावेळी लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणाही केली जाऊ शकते. राज्यांनी लॉकडाऊन वाढवले असले तरी काही राज्य अजूनही केंद्राच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. रेल्वे, विमान अशा विविध सेवा केंद्राच्या […]