
मुंबई (मवृसे)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करताना देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला आहे. देशातील करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच करोनाला पराभूत करण्यासाठी केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या सर्वांवर बारकाईने लक्ष देत आहे. करोनाला कुठल्याही परिस्थितीत हरवायचे आहे. यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. अमेरिका, इटली आणि स्पेन यासारख्या देशात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या ठिकाणीदररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे.
इतर देशांच्या तुलनेत भारतात मृत्यु ुखींची संख्या आणि करोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या कमी आहे. करोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज पुन्हा एकदा वैज्ञानिक दिशा स्पष्ट केली. करोना संदर्भातील अपडेटसाठी जनतेने सरकारी अॅप आरोग्य सेतू चा वापर करावा असे सांगत मोदींनी आज देशातील तरूण वैज्ञानिकांना भावनिक साद घातली. करोना व्हायरसवर लस तयार करायची आहे, त्यासाठी देशातील तरुण वैज्ञानिकांनी पुढे यावे असे मोदींनी म्हटले आहे.



