चंद्रपुर

लॉकडाऊन वाढले, जीवनावश्यक वस्तूंच्या सुरळीत पुरवठ्याचे प्रशासनाचे नियोजन

चंद्रपूर (का.प्र.) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील १८ दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये. मात्र या काळात गरिबातील गरीब जनतेला अन्नधान्य पुरविण्याची व्यवस्था नियोजित असून पुरेसा अन्नसाठा जिल्ह्यात आहे. नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता राहील. यासाठी प्रशासन तयार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.आज सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली. यासंदर्भात राज्य शासनाचे सविस्तरनिर्णय प्रतीक्षेत आहेत.

मात्र जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा,रेशन दुकानामार्फत होणारा पुरवठा, याबाबत जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले असल्याचे जिल्हाधिकाèयांनी स्पष्ट केले आहे. २१ लाख लोकसंख्या असणाèया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत ३ लक्ष ९३ हजाररेशन कार्ड धारक आहे. या माध्यमातून १५ लक्ष नागरिकांना स्वस्त धान्याचा पुरवठा होतो. यामध्ये २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदळाचा पुरवठा केला जातो. सोबतच ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही .अशा ४० हजार नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. त्यांना देखील जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महानगरपालिका, नगरपालिका तसेच गावागावांमध्ये शासकीय यंत्रणेसोबत स्वयंसेवी संस्था निराश्रित, निराधार, बेघर ,लोकांना तयार अन्न पुरवीत आहेत. या परिस्थितीत कोणाची उपासमार होत असेल किंवा अन्नधान्यापासून वंचित असल्यास जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांनी घराबाहेर न पडता अशा नागरिकांना मदत करण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकांचा उपयोग करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार १४ एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून ५८ नागरिकांची नोंद करण्यात आली. ५० स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३२ नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. १८ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या २७ हजार ६६२ आहे. यापैकी २ हजार ८५९ नागरिक निगराणीखाली आहेत. तर १४ दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २४ हजार ८०३ आहे.

जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ५५ आहे. जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात शहरात निर्जंतुकीकरण सुरू केले आहे.सोबतच येणा?्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर कडेकोट नाकाबंदी केली आहे. शिवाय छोटे मार्ग नागरिकांची गर्दी वाढू नये बंद केले आहे. नागरिकांनी त्यांच्या आरोग्याच्या या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करावे, लॉकडाऊन संपेपर्यंत सहकार्य करावे,असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात देखील पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला आहे. प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गावकèयांच्या मदतीने येणाèयांची नोंद केली जात आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांमधून घुसखोरी होणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे, तसेच रस्त्यावर दुचाकी वाहनांची संख्या कमी करण्याचे व विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. आतापर्यंत ६५९ वाहने जप्त करण्यात आली असून १४५ केसेस करण्यात आले आहे. ४३ लोकांना अटक करण्यात आली असून ही संख्या दुर्दैवी असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात श्वसणाच्या आजाराच्या संदर्भात तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. १०० डिग्री पेक्षा अधिक असणारा ताप, खोकला श्वसनासाठी होत असलेला त्रास कोणाला असल्यास यासंदर्भात नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हामध्ये श्वसनाच्या संदर्भातील रुग्णांची तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.कोणत्याही रुग्णाला अशा पद्धतीने अधिक त्रास होत असल्यास आवश्यक दूरध्वनी करून १०८ सुविधा घरपोच रुग्णाला रुग्णालयापर्यंत तपासणीसाठी घेऊन जाईल.

या सुविधेचा देखील लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास ०७१७२२५३२७५, ०७१७२-२६१२२६ या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अ?ॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या ०७१७२-२७०६६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी ०७१७२-२५१५९७, टोल फ्री क्रमांक १०७७ यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाèया वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या ०७१७२-२७२५५५ या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक १५५-३९८ वर दूरध्वनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.