चंद्रपूर, आज लोहारा-मामला वनक्षेत्रातील अदानी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक वृक्षांना राखी बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही एकत्रीत येत इको-प्रो तर्फे आयोजन करण्यात आले. यावेळी तताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगावकर, उप संचालक बफर जी गुरुप्रसाद, डॉ स्वप्निल माधमशेट्टीवार, उप प्राचार्य, सरदार पटेल महाविद्यालय, किशोर जामदार, adv वर्षा जामदार, इको-प्रोचे अध्यक्ष […]
विदर्भ
ई पास रद्द, मात्र राज्यांतर्गत रेल्वेन प्रवास करण्याची परवानगी.
मुंबई (प्रति ): 01 सेप्टेंबर केंद्र सरकारनं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्यानं शिथिलता आणताना अनलॉकला सुरुवात केली. ज्यानंतर अनलॉकच्या चौथ्या (अनलॉक-४.०) टप्प्यामध्ये अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. ज्यामध्ये अखेर महाराष्ट्रातही आंतरजिल्हा प्रवावासाठी सक्तीचा असणारा ई- पास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातच भर म्हणजे आता मध्य रेल्वेकडूनही राज्यांतर्गत रेल्वे प्रवासास परवानगी देण्यात […]
राकांपा अध्य्क्ष शरद पवारच्या गार्डला कोरोना
मुंबई(प्रति) :राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गार्डला कोरोना झाल्याने वृत नुकतेच उजेडात आले. याबाबत सविस्तर वृत असे कि शरद राकांपा अध्यक्ष शरदजी पवार यांच्या कार्यालयातील दीघंना व उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने निर्वशनास आले आहे. मात्र शरद पवारांची टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे .
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली:केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः हा अमित शाह यांनीच ट्विटरद्वारे माहीत दिली. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हीड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे,पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल […]
यवतमाळ मध्ये १५ नवे कोेरोना पॉझिटिव्ह
यवतमाळ (मवृसे) यवतमाळमध्ये एकाच भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने तसेच आज १५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह मिळाल्याने यवतमाळ शहर तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी दिले आहेत. रुग्णालये, औषधी दुकाने आणि दुधाची दुकाने वगळता किराणा आणि भाजीपाल्याची दुकानेही बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी तीन दिवस विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी […]
नागपुरात कोरोनाने गाठले शतक; साखळी तुटेना
नागपूर (मवृसे) सात दिवसांपासून सातत्याने करोनाचे संक्रमण सुरू असलेल्या उपराजाधानीसाठी अनुभवलेला समाधानाचा श्वास फार काळ तग धरू शकला नाही. संत्रानगरीच्या जीवाला घोर लावणाèया करोनाबाधिताच्या साखळीत दोन नवे रुग्ण वाढल्याने संक्रमणाच्या आकड्याने शुक्रवारी शतक गाठले. करोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झालेल्यांमध्ये ५२ वर्षीय पुरुष आणि ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (निरी) तपासलेल्या […]
नागपुरात एका रुग्णापासून ५४ जणांना लागण!
नागपूर (मवृसे) राज्यातील काही भागांमध्ये करोनाचा विळखा फारसा चिंताजनक नसल्याने ग्रीन झोनमधील काही जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून अंशत: शिथिलता मिळण्याचे शुभसंकेत मिळत आहेत. मात्र शहरातील एकाच व्यक्तीच्या निकट सहवासात आलेल्यांना करोनाचा विळखा विस्तारलाच जात आहे. त्यामुळे नागपूरसमोर रोज नवनव्या साखळदंडाचा पाश आवळला जात आहे. शहरात मंगळवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या नऊ कोरोना बाधितांमुळे हा विळखा आणखी घट्ट झाला. त्यामुळे […]
नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या ८० वर
नागपूर (मवृसे) करोना विषाणूची साखळी नागपुरभोवती दिवसेंदिवस करकचून आवळली जात आहे. एकाच दिवशी काल दहा रुग्णांना प्रादुर्भाव झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये यात आणखी आठ जणांची भर पडली. त्यामुळे या विषाणूने शहरात शिरकाव केल्यापासून आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ८० पर्यंत पोहोचली आहे. चिंतेची बाब म्हणजे शहरात सोमवारी नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या आठ जणांपैकी बहुतांश जण हे सतरंजीपुरा […]
नागपूरमध्ये आणखी ९ जणांना कोरोना
नागपूर (मवृसे) करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा तांडव सुरू असलेल्या नागपुरातील सतरंजीपुरासाठी आजचा सुट्टीचा दिवस काळा रविवार ठरला. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात आणखी नऊ जणांना करोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे आता नागपुरातील करोना बाधितांच्या संख्येने ६३ वरून थेट ७२ वर उसळी घेतली आहे. नागपूरसाठी सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, करोनाची लागण झालेल्या एकूण ७२ रुग्णांपैकी […]








