विदर्भ

नागपुरात कोरोनाने गाठले शतक; साखळी तुटेना

नागपूर (मवृसे) सात दिवसांपासून सातत्याने करोनाचे संक्रमण सुरू असलेल्या उपराजाधानीसाठी अनुभवलेला समाधानाचा श्वास फार काळ तग धरू शकला नाही. संत्रानगरीच्या जीवाला घोर लावणाèया करोनाबाधिताच्या साखळीत दोन नवे रुग्ण वाढल्याने संक्रमणाच्या आकड्याने शुक्रवारी शतक गाठले. करोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झालेल्यांमध्ये ५२ वर्षीय पुरुष आणि ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (निरी) तपासलेल्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यांमध्ये महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दुसरा नमुना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) विषाणू प्रयोगाशाळेत पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागपुरातील करोनाबाधितांचा आकडा आता १०० वर पोचला आहे. सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असलेल्या नागपुरात ८४ रुग्णांची नोंद ही गेल्या फक्त ३ आठवड्यांध्ये नोंदविली गेली आहे. एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वी शहरातील करोनाबाधितांचा आकडा हा जेमतेम १६ वर स्थिरावला होता. सतरंजीपूरा येथील करोनाबाधित रुग्ण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचाराला आल्यानंतर ही साखळी एकामागे एक उकलत गेली.

Leave a Reply

Your email address will not be published.