महाराष्ट्र

कोरोनाः राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीस केंद्राची मान्यता

मुंबई (मवृसे) करोना उपचारासाठी महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. करोना प्रतिबंधासाठी केल्या जाणाèया उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला हर्षवर्धन यांच्याकडून मान्यता देण्यात आली, असे टोपे यांनी सांगितले. पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने करोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा या बैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आला.त्याचबरोबर पीपीई किटचे निर्जंतुकीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये करोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.