मुंबई (मवृसे) भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंहने प्रेक्षकांविना तेराव्या हंगामाची आयपीएल स्पर्धा खेळवण्याला आपला पाठींबा दर्शवला आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर, स्पर्धा खेळवण्यास काहीच हककत नाही, कारण अनेक लोकांचा रोजगार या स्पर्धेवर अवलंबून आहे. करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेता बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. […]
क्रीड़ा
विश्वचषकाला अजुन वेळ आहे, घरातच थांबा ! फटाके फोडणाऱ्या लोकांना महिटमॅनमचा टोला
मुंबई (मवृसे)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता देशभरात नागरिकांनी आपल्या घरातले लाईट घालवत, दिवे पेटवून करोनाविरुद्ध लढ्यात आपला सहभाग नोंदवला. मात्र देशातील काही भागांमध्ये लोकांनी यावेळेलाही नियमांचा भंग केलाच. काही लोक हातात मशाली घेऊन रस्त्यावर उतरले होते, तर काही ठिकाणी लोकांनी फटाके फोडले. सोलापूर, दिल्ली यासारख्या शहरांमध्ये आग लागण्याच्याही […]
माणसे जगली तरच क्रिकेट खेळण्याला अर्थ – नवदीप सैनी
मुंबई (मवृसे)देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका भारतातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयसह सर्व क्रीडा संघटनांनी आपल्या महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता, १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल याची शाश्वती नाही. बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आशिया चषकाऐवजी आयपीएल स्पर्धा खेळवता येईल […]
वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी ऑस्टड्ढेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचे धाडसी पाऊल
मुंबई (मवृसे)करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक क्रीडापटू सध्या आपल्या घरात परिवारासोबत वेळ घालवत आहेत. करोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या जगभरातील वैद्यकीय यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत ऑस्टड्ढेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने सर्व वैद्यकीय कर्मचाèयांचे कौतुक करण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलले आहे. वॉर्नरने आपले सर्व केस कापतानाचा […]
करोनाने घेतला क्रीडा क्षेत्रातील दुसरा बळी; महान स्क्वॅश खेळाडूचे निधन!
कराची (प्रति)पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॅश खेळाडू आजम खान यांचे लंडनमध्ये करोना व्हायरसने मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी रविवारी ही माहिती दिली. खान यांनी १९५९ ते १९६१ या काळात सलग ब्रिटन ओपनचे विजेतेपद मिळवले होते. गेल्या आठवड्यात त्याची करोना टेस्ट करण्यात आली होती आणि ती पॉझिटिव्ह होती. लंडनमधील ईलिंग रुग्णालयात शनिवारी त्यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. […]
करोनाग्रस्तांसाठी सिंधूने राज्य सरकारला दिले १० लाख!
हैदराबाद (मवृसे)गेल्या काही दिवासांपासून भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. करोनाची लागण रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी सर्वांना घरी राहण्याचे आवाहन करणारी भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने राज्य सरकारांना १० लाख रुपयांची मदत केली आहे.सिंधूने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्य सरकारांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची […]
टोकियो ऑलिम्पिक २०२० नव्हे, २०२१ अखेर ऑलिम्पिक आयोजन लांबणीवर!
। टोकियो दि. २४ करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. २४ जुलै २०२० पासून रंगणारी प्रतिष्ठेची टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धादेखील पुढे ढकलण्याचे संकेत देण्यात आले […]
इंग्लंडचा माजी क्रिकेटर पीटरसनचे कोरोनाबाबत भारताला आवाहन
। नवी दिल्ली दि. २२ भारतात कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. हा धोका कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी भारतातील नागरिकांना संबोधित करत असताना रविवारी जनता कफ्र्यूचं आवाहन केलं होतं. २२ मार्चला संपूर्ण देशात जनता कफ्र्यू असणार आहे. फक्त भारतीयच नाही तर विदेशातील व्यक्ती देखील याच्या समर्थनात आले आहेत. इंग्लंडचा माजी […]
क्रिकेटविश्वात Coronavirus चा शिरकाव; जगातील पहिल्या क्रिकेटपटूला कोरोना व्हायरसची लागण
जगभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रभाव आता अजून वाढला आहे. आतापर्यंत अनेक क्षेत्रातील मान्यवरांना या विषाणूने ग्रासले आहे. आता क्रिकेट विश्वातही या विषाणूचा शिरकाव झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या पहिल्या क्रिकेटरची पुष्टी झाली आहे. पाक मूळचा माजिद हक (Majid Haq) याची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. स्कॉटलंड क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या माजिदला उपचारासाठी […]









