
मुंबई (मवृसे)करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक क्रीडापटू सध्या आपल्या घरात परिवारासोबत वेळ घालवत आहेत. करोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या जगभरातील वैद्यकीय यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत ऑस्टड्ढेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने सर्व वैद्यकीय कर्मचाèयांचे कौतुक करण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलले आहे. वॉर्नरने आपले सर्व केस कापतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून, त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आपला साथीदारी स्टिव्ह स्मिथ यालाही केस कापण्याचे आव्हान दिले आहे. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलसह सर्व महत्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. जपाननेही यंदाच्या वर्षी होणाèया ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन एक वर्षासाठी पुढे ढकले आहे. अनेक महत्वाच्या देशात अद्यापही करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही स्पर्धा खेळवणं योग्य नसल्याचे मत अनेक क्रीडापटूंनी व्यक्त केले होते.



