चंद्रपुर

कुबेर रुग्णालयाची रुग्णांच्या नातेवाईकांनी केली तोडफोड

चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर नगरीतील प्रख्यात व नामवंत डाँ. कुबेर यांचे रुग्णायलात आज सकाळी उपचार दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला.सदरहु रुग्णांचा प्राण डाँक्टरांच्या निष्काळजी पणामुळे झाला हे कारण समोर करुन चक्क रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय गाठून तेथील अतिदक्षता विभागाच्या मुख्य दाराचे काचे फोडली यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले उपरोक्त घटनेबाबत हाती आलेल्या माहिती नूसार असे कळते कि २६मार्चला राकेश यादव नावाचा ३६ वर्षिय युवक प्रकृती बरी नाही म्हणून उपचारार्थ दाखल झाला.त्याची तब्येत अधिक खराब झाल्यामुळे रुग्णालयातील डाँक्टरांनी त्यास तात्काळ भरती होण्याचा सल्ला दिला. नंतर लगेच त्यास अतिदक्षता विभागात ठेवून त्याचेवर उपचार करणे सुरु ठेवले.

विशेषम्हणजे सदरहु रुग्णांचे लिव्हर खराब झाले होते असे सर्वत्र बोलल्या जाते. मागील वर्षात तो नागपूर स्थित आँरेज सिटी हॉस्पिटल ला उपचार घेत होता असे समजते. परंतु त्यानंतर परत उपचारार्थनागपूरला तो त्या रुग्णालयात गेला नाही असे चौकशी अंती कळले. उपचार करीत असतांना डाँक्टर मंडळींना त्यास अनेक आजार असल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने त्यावर उपचार करणे सुरु होते. परंतु आज सकाळी त्याची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली. त्याचे मृत्यूची बातमी बाहेर पडताच काही नातेवाईकांनी रुग्णालयात येवून गोंधळ घातला एव्हढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी चक्क दवाखान्यातील अतिदक्षता विभागाच्या मुख्य दरवाजाची तोड़फोड़ देखिल केली.

नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्यामुळे तेथील कर्मचारी वर्ग पूर्णता भयभीत झाला होते. प्रत्येक जण सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत होते घटनेचे गांभिर्य लक्षात घेता लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिस कुठलाही विलंब न लागता घटनास्थळी दाखल झाले. नंतर रुग्णालयातील प्रेत नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आले. पण घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती हे मात्र खरे आहे. रुग्णाच्या वैद्यकिय बिलाबाबत कुठलाही वाद किंवा बाचाबाची झाली नव्हती असे डाँ.कुबेर यांचे रुग्णालयात कार्यरत डाँ .सुजय कोतपल्लीवार यांनी एका भेटी दरम्यान या प्रतिनिधिस सांगितले. या प्रतिनिधीने रुग्णाच्या नातेवाईकाची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची भेट होवू शकली नाही.

रूग्णालयाच्या झालेल्या तोडफोडीचा इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे निषेध
चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठीत वैद्यक व्यवसायी डॉ. कुबेर कोतपल्लीवार यांच्या साई डिव्हाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल या रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना आज घडली. मृत पावलेला रूग्ण हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला रूग्ण होता. त्याला अनेक गंभीर आजार झाले होते. रूग्णाचे नातेवाईक स्वतःच रूग्णाला पुढील उपचारासाठी नागपूरला घेवून जाणार होते. मात्र कोरोना च्या लागणीमुळे त्यांनी नागपूरला नेणे लांबणीवर नेले.

सदर रूग्णाच्या डिस्चार्जची तयारी सुध्दा करण्यात आली होती. अशात रूग्णाचा मृत्यु झाला. अनेक आजारांमुळे रूग्णाचा मृत्यु झाला मात्र रूग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड करताना जी कारणे सांगीतली ती पूर्णतः निराधार आहेत. रूग्णाच्या उपचारासंदर्भात कोणताही हलगर्जीपणा करण्यात आलेला नाही. अशा पध्दतीने एका रूग्णालयात तोडफोड करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. ही कृती पूर्णपणे कायद्याच्या विरोधातील आहे. या घटनेचा इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे आम्ही निषेध
करतो.

Leave a Reply

Your email address will not be published.