चंद्रपुर

गरजुंसाठी नियमित जेवणाची सोय तातडीने उपलब्ध करा-राहुल पावडे

चंद्रपूर (का.प्र.) संसर्गजन्य कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशभर २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना रस्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सर्वत्र जिल्हाबंदी सुद्धा घालण्यात आली आहे. त्यामुळे इतर शहरातील, राज्यातील नागरीक, अडकलेले कामगार, विस्थापित तसेच स्थानिक गरजू यांच्या भोजनाची अडचण निर्माण होत असल्याने उद्या २ एप्रिल सायंकाळपासून चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे नियमितरित्या दोन्ही वेळेचे भोजन गरजूंना उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी १ एप्रिल रोजी झालेल्या स्थायी समिती विशेष बैठकीत दिले. अहोरात्र काम करणाèया मनपाच्या महिला डॉक्टर्स, नर्सेस, मनपाचे शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपात्कालीन व्यवस्था सांभाळीत आहे.

प्रशासन व महानगरपालिकेच्या वतीने जी जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे ती खèया अर्थाने ते पार पडत आहेत. आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात मनपाचे अनेक कर्मचारी २४ तास नागरीकांच्या सेवेत कर्तव्यावर आहेत. अश्याप्रसंगी आरोग्य विभागास मास्क, सॅनिटायझर्स व काही अतिरिक्त साधनांची आवश्यकता असेल किंवा संसर्ग पसरून नये म्हणून साफ सफाईसाठी अतिरिक्त स्प्रेईंग अथवा फॉगिंग मशीनची आवश्यकता असेल तर ती त्वरित खरेदी करण्याचे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले. संचारबंदीमुळे अडकलेल्या परप्रांतीय लोकांसोबत स्थानिक गरजुंनाही मदतीची आवश्यकता लक्षात घेता भोजनदान मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे असल्याने सदर निर्णय त्वरीत घेण्याच्या दृष्टीने स्थायी समितीची विशेष बैठक बोलविण्यात आली होती.

मनपातर्फे नियोजन करून झोन कार्यालयामार्फत उद्या सायंकाळपासून नियमित दोन वेळेचे जेवण गरजूंना देण्याचा तातडीचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, गजानन बोकडे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सचिन पाटील, शीतल वाकडे, शहर अभियंता महेश बारई, स्थायी समितीचे सन्माननीय नगरसेवक उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.