
ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी तालुक्यात मागील काही दिवसापासून वाघाचा मुक्त संचार दिसून येत आहे …
दरम्यान , बुधवारी सायंकाळच्या सुमारास तुमडीमेंढा गावाजवळ पट्टेदार वाघ डौलात ब्रम्हपुरी – नागभीड मार्ग पार करीत असल्याचा थरार अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवाला . यावेळी मार्गाच्या दोन्ही बाजूने आपली वाहने थांबवून प्रवाशांनी वाघाचे दर्शन घेतले . मात्र , ऐंशेती हंगामात वाघाचा वावर दिसत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे . हा वाघ उमरेड जवळील कऱ्हांडला जंगलातून आला असल्याची शक्यता वनविभागाकडून व्यक्त होत आहे . ब्रम्हपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या वाघाचा बंदोबस्त कार्रवा अशी जनतेची मागांनी आहे .



