क्रीड़ा

माणसे जगली तरच क्रिकेट खेळण्याला अर्थ – नवदीप सैनी

मुंबई (मवृसे)देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका भारतातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयसह सर्व क्रीडा संघटनांनी आपल्या महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता, १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल याची शाश्वती नाही. बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आशिया चषकाऐवजी आयपीएल स्पर्धा खेळवता येईल का या प्रयत्नात आहे. तर काही अधिकाèयांच्या मतानुसार यंदाचा हंगाम रद्द होऊ शकतो. मात्र भारताचा तरुण गोलंदाज नवदीप सैनीच्या मते, सध्याच्या घडीला आयपीएल किंवा कोणत्याही क्रिकेटपेक्षा माणसांचा जीव वाचवणे हे अधिक महत्वाचे आहे.

आयपीएल ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे यंदा ही स्पर्धा रद्द झाली तर साहजिक दुःख होणारच. मात्र सध्या आपण ज्या परिस्थितीत आहोत ते पाहता लोकांचे आरोग्य हे अधिक महत्वाचे आहे. क्रिकेटपटू होण्याआधी आम्ही सर्वजण माणूस आहोत. त्यामुळे माणसे जगली तरच क्रिकेट खेळण्याचा अर्थ आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला क्रिकेट खेळवले जात नाहीये हा फार मोठा मुद्दा नाही. सध्या लॉकडाऊनच्या काळात नवदीप आपल्या घरी आहे. मात्र या काळातही त्याचा सराव सुरुच आहे. टेनिस बॉलच्या सहाय्याने तो गोलंदाजी करतोय. याचसोबत परिवारासोबत वेळ घालवण्याकडेही त्याने प्राधान्य दिले आहे. सध्या आपण लॉकडाऊन आहोत, तुरुंगात नाहीःआपल्या सर्वांना आपल्या घरातल्यांसोबत, आई-वडिलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळतेय आणि याकडे आपण सकारात्मकरित्या पहायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published.