चंद्रपुर जिल्हा

पोलिसांचे कारवाईत ११ आरोपीसह ३ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त

राजुरा(ता.प्र.)विरुर पोलिसांनी धडक मोहीम राबवित दुसरे दिवशीही तीन वेवेगळ्या कारवाईत विरुर हद्दीतून गावठी दारूची तस्करी करणाèया ११ आरोपीना गावठी दारू व दुचाकी असे ३ लाख २० हजार रुपयाचे मुद्देमालासह अटक केली आहे पोलिसांचे या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे तर दारू तस्कराचे धाबे दणाणले आहे. कोरोनामुळे देशी विदेशी दारूची चोरटी तस्करी बंद आहे त्यामुळे गावठी दारूला मागणी आहे आणि हि गावठी दारू विरुर, सुबई, मुंडीगेट या गाव परिसरात मोठ्या प्रमाणात काढण्यात येते असे समजते त्यामुळे काही तस्करानि या गावाकडे मोर्चा वळविला हि माहिती विरुर पोलिसांना मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी,आणि उपनिरीक्षक सदानंद वडतकर हे आपल्या कर्मचारी सह पाळत ठेऊन कारवाई करीत आहेत

या मोहीम अंतर्गत सलग दुसरे दिवशीहिपाळत ठेऊन तीन वेगवेगळ्या धाडीत विरुर पोलीस हद्दीतून गावठी दारू तस्करी करीत असलेले ११ आरोपी कडून ४० हजार रुपये किमतीचे दोनशे लिटर गावठी दारू आणि याकामी वापरण्यात आलेली २लाख ८० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी असे एकूण ३ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सलग दुसरे दिवशी विरुर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दारू तस्काराचे मुसक्या आवळल्या जात आहे याकारवाई बद्दल जनतेनी पोलिसांचे कौतुक करीत आहेत. हि कारवाई ठाणेदार कृष्णा तिवारी यांचे नेतृत्वात उपनिरीक्षक सदानंद वडतकर, प्रल्हाद जाधव, भुजंग कुलसंगे, दिवाकर पवार, माणिक वागदरकर, विजय मुंडे, अशोक मडावी, प्रमोद मिलमिले आदींनी केली पुढील तपास सुनील राऊत आणि दिवाकर पवार करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *