चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

*दारूच्या नशेत मुलाची हत्या करुन बापाचा स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न*

तालुक्यातील राजोली येथील गणेश विट्टल चौधरी वय 31 वर्षे हा आपल्या पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे राहात होता, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तो दारु पिऊन पत्नीला मारहाण केल्याने ती घरून निघुन गेली, घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु राहात होता, दरम्यान आज 09/04/2023 रोज रविवारी पहाटे 5 वाजता दरम्यान त्याने दारुच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबुन खुन केला, आणि स्वताच्या गळ्यावर चाकुने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दारूच्या आहारी गेलेल्या एका पित्याने पोटच्या मुलाची गळा दाबुन खुन केल्याची घटना रविवारी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान राजोली  येथे घडली. गळा दाबुन हत्या केलेल्या पित्याने स्वतःच्या गळ्यावर चाकुने वार करुन आत्महत्या  करण्याचा प्रयत्न केला. प्रियांशु गणेश चौधरी वय (3) वर्षे  असे गळा दाबुन खुन केलेल्या बालकाचे नांव आहे तर गणेश विट्टल चौधरी वर्षे (३१) असे पोटच्या मुलाचा खुन करणाऱ्या पित्याने नांव आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच
सदर घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन पंचनामा केला असुन जखमी गणेश चौधरी याला उपचारार्थ मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. दारूची नशा करते कुटुंबाची दशा अशी चर्चा राजोली गावात व परिसरात केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.