चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

राज्यस्तरीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धा जिल्ह्यात ३ स्वर्ण १ कास्य स्ट्रॉंग वुमेन व स्ट्रॉंग मॅन पदकाची चंद्रपूरची झेप

विदर्भ पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व नागपूर जिल्हा पाॅवरलिफ्टिंग असोसिएशन व संकल्प बहुउद्देशीय संस्था रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनिअर व ज्युनिअर मुले व मुली पाॅवरलिफ्टिंग स्पर्धा १ ते ३ मे २०२३ ला श्रीमती राजेश्वरी रेड्डी ज्युनियर कॉलेज कोंदामेडी, रामटेक जिल्हा नागपूर येथे पार पाडल्या. स्पर्धेत राज्यातून १७३ खेळाडू सहभागी झालेले होते चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करिता व खेळाडू सहभागी झाले यात तनवी राहते ६९ किलो वजन गटात मध्ये ३०० किलो उचलून स्वर्ण  पदक, तसेच सुरज मेश्राम ६६ किलो वजन गटा मध्ये ४६५ किलो उचलून स्वर्ण पदक, तसेच अमित येरगुडे ७४ किलो वजन गटांमध्ये ६०२.५ किलो उचलून स्वर्ण पदक, तसेच मोहन पारखी ८४ वजन गटामध्ये २३७ किलो उचलून कास्य पदक, *तसेच स्ट्रॉंग वुमेन ऑफ व्ही. पी. ए. जूनियर अँड हाय टोटल ऑफ चॅम्पियनशिप तनवी रहाटे, तसेच स्ट्रॉंग मॅन ऑफ व्ही. पी. ए. जुनियर ऑफ हाय टोटल ऑफ चॅम्पियनशिप *अमित येरगुडे यांना प्राप्त झाले ३ स्वर्ण १ कास्य स्ट्रॉंग वुमेन स्ट्रॉंग मॅन पदकाची जिल्ह्याच्या नावे केली. तर श्री. भाविक भयम, श्री .अमोल आवडे, श्री. प्रज्वल पवार, श्री. संकेश बोधे. यांनी आपला सहभाग नोंदविला. विजेते खेळाडूंनी आपला विजयाचे श्रेय त्यांचे माता पिता व प्रशिक्षक व जिल्हा असोसिएशन ला यांना दिले.
विजयजी खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे  कार्याध्यक्ष श्री. मेश्राम, अध्यक्ष श्री. सुरेश पाचपोर, उपाध्यक्ष श्री. रवींद्र गुरनुले, सचिव श्री. गजानन पांडे,   कोषाध्यक्ष श्री. कुमार पिंजरला, सदस्य श्री. प्रदीप शिंदे व मुन्ना कटरे .आदींनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published.