
यवतमाळ (मवृसे)राळेगाव तालुक्यात वीज अंगावर कोसळून सहा जण जागीच ठार झाल्याची घटना काल, रविवारी रात्री गुजरी येथे घडली. मृत सहा जण हे एकाच कुटुंबातील होते. विदर्भात अनेक ठिकाणी काल, रात्री विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाèयासह पावसानं हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यातही अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. राळेगाव तालुक्यातील गुजरी येथील गोंडे यांच्या शिवारात अंगावर वीज कोसळून सहा जण जागीच ठार झाले. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत व्यक्ती या एकाच कुटुंबातील होत्या. त्यात चार पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. मृतांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत.



