विदर्भ

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली:केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः हा अमित शाह यांनीच ट्विटरद्वारे माहीत दिली. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हीड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे,पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो,तुमच्यापैकी जो कोणी गेल्या काही दिवसामध्ये माझ्या संपर्कात आला असेल, त्यांनी कृपया स्वतः विलगिरीकरणात रहावे आणि आपली चाचणी करून घ्यावी असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.