देश दुनिया

देशात २५ जिल्ह्यांत कोरोनाचा नवीन रूग्ण नाही -केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (मवृसे) देशातील करोना रुग्णांची संख्या ९१५२. गेल्या २४ तासांत ७९६ नवे रुग्ण आढळले. तर ३५ जणांचा मृत्यू झाला. मृतांची देशातील एकूण संख्या ३०८ इतकी झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली. करोनामुक्त होणाèया रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ८५७ जण बरे झाले असून एका दिवसात १४१ जण बरे झाल्याची एक सकारात्मक बाब समोर […]

देश दुनिया

दिल्ली-एनसीआरला भूकंपाचा सौम्य धक्का

नवी दिल्ली (मवृसे) दिल्ली-एनसीआरमध्ये संध्याकाळी ५.५० मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. काही गलरीत येऊन उभे राहिले. भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ३.५ इतकी नोंदवली गेली. दिल्ली-एनसीआरमधील भूकंपाचे केंद्र हे पूर्व दिल्लीत जमिनीखाली ८ किलोमीटर इतक्या अंतरावर होते.

देश दुनिया

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ६ हजार ६७१

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ६ हजार ६७१ एवढी झाली आहे. मागील २४ तासात ८९६ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही संख्या वाढली आहे. आत्तापर्यंत २०६ जणांचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर ५१६ जणांना विविध रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. एएनआयने या संदर्भातले ट्विट केले आहे. भारताकडे […]

देश दुनिया

घाबरू नका,देशात अद्याप कोरोनाचा सामूहिक संसर्ग नाही -आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (मवृसे) देशात करोनाचा सामूहिक संसर्ग अद्याप झालेला नाही. यामुळे कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाही. पण प्रत्येकाने सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. करोनाचा संसर्ग हा स्थानिक आहे की सामूहिक यापेक्षाही महत्त्वाचे आहे ते अधिक संसर्ग असलेले भाग सील करून पूर्ण दक्षता घेण्याची, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले. […]

देश दुनिया

१४ एप्रिलला लॉकडाउन संपणार का? नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करण्याची शक्यता

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. मात्र अद्यापही देशात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. आपला निर्णय जाहीर करण्याआधी नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व […]

देश दुनिया

२४ तासांत ५४९ नवीन रुग्ण, १७ जणांचा मृत्यू

आज सायंकाळच्या सुमारास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना फैलावाबद्दल माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच आत्तापर्यंत देशात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचली. उल्लेखनीय म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची […]

देश दुनिया

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पूर्णपणे उठवणार नाही, पंतप्रधान मोदींनी केले स्पष्ट

मुंबई (मवृसे)करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही भारतात करोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन पुढे वाढवला जाणार की १४ एप्रिलला संपणार याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पंतप्रधानांसोबत बैठकीत सहभागी झालेल्या […]

देश दुनिया

देशात कोरोना रुग्णांची संख्या ४,४२१

कोरोनाने जगातील अनेक देशांसह भारतातही हाहाकार माजवला आहे. गेल्या २४ तासांत ३५४ नव्या रुग्णांची भर पडली असून देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ४,४२१ वर पाहोचली आहे. आता पर्यंत ११४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. करोना विषाणूशी लढण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरू आहे. सरकारने जारी केले […]

देश दुनिया

पंतप्रधानांनी लॉकडाउन न वाढवण्याचे दिले संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाउनच्या काळातले निर्बंध सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे. तसेच लॉकडाउन संपल्यानंतर आवश्यक धोरणे आखणे गरजेचे आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. लॉकडाउन संपल्यानंतर दहा मुख्य निर्णयांसह तयार रहा असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांना म्हटले आहे. […]

देश दुनिया

कोरोनाशी लढाः खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात

नवी दिल्ली (मवृसे)केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाचे पाऊल उचलत खासदार निधीअंतर्गत मिळणारा फंड पुढील दोन वर्षांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या बरोबरच मंत्रिमंडळाने वर्षभरासाठी खासदारांच्या पगारातून ३० टक्क्यांची कपात करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या बाबतच्या अध्यादेशाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. खासदार निधी आणि खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात करून जमा होणार निधी करोनाविरुद्धच्या लढाईसाठी वापरण्यात […]