आज सायंकाळच्या सुमारास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना फैलावाबद्दल माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच आत्तापर्यंत देशात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचली. उल्लेखनीय म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १६६ वर पोहचली. उल्लेखनीय म्हणजे, यातील १७ मृत्यू मंगळवारी – बुधवारी झाल्याची नोंद करण्यात आली, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.




