देश दुनिया

दिल्ली-एनसीआरला भूकंपाचा सौम्य धक्का

नवी दिल्ली (मवृसे) दिल्ली-एनसीआरमध्ये संध्याकाळी ५.५० मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. काही गलरीत येऊन उभे राहिले. भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ३.५ इतकी नोंदवली गेली. दिल्ली-एनसीआरमधील भूकंपाचे केंद्र हे पूर्व दिल्लीत जमिनीखाली ८ किलोमीटर इतक्या अंतरावर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *