गडचिरोली

गडचिरोलीतील २ विद्यार्थिनींसह विदर्भातील ३६ विद्यार्थी मलेशियात अडकले

गडचिरोली (प्रति)गडचिरोलीतील दोन विद्यार्थीनीसह विदर्भातील ३६ विद्यार्थी मलेशियात अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी नागपूरच्या तिरपुडे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे असून १५ डिसेंबरला सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मलेशियाला गेले होते. मात्र २५ मार्च रोजी मलेशियातदेखील कोरोना व्हायरसच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन झाला. लॉकडाऊनमुळे प्रशिक्षण कालावधी चार महिन्यांवर आणत विद्याथ्र्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. मात्र त्याच काळात भारताने आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केल्याने हे विद्यार्थी मलेशियात अडकले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अडचणीतून सोडविण्याची विनंती केली आहे. गडचिरोलीतील प्रतीक्षा साळवे आणि सृष्टी बेहेरे या दोन विद्यार्थीनींसह नागपूरच्या तिरपुडे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे ३६ विद्यार्थी १५ डिसेंबर रोजी मलेशिया येथे प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते. मलेशिया येथील ईपो आणि पेनांग या दोन शहरांमध्ये हे विद्यार्थी विखुरले आहेत. यात ६ विद्यार्थीनी आहेत.

मलेशियाच्या शहरांतील २ फाईव्ह स्टार हॉटेलात त्यांचे प्रशिक्षण सुरु असतांना अचानक लॉकडाऊन जाहीर झाले. लगेच या विद्याथ्र्यांनी २२ एप्रिल रोजीची परतीची तिकिटे आरक्षित केली. मात्र सध्या या विद्याथ्र्यांची स्थिती वाईट झाली आहे. ज्या ठिकाणी ते निवासाला आहेत. तिथल्या खाण्याच्या सर्व वस्तू संपल्या आहेत. विद्याथ्र्यांजवळची रक्कम देखील संपली असून ज्या वस्तू आसपास मिळत आहेत. त्या अत्यंत महागड्या आहेत. अशा स्थितीत मलेशिया येथे वास्तव्य करणे अशक्य आहे. या विद्याथ्र्यांना या संकटातून सोडविण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान तिरपुडे कॉलेजच्या प्राचार्यांनी पंतप्रधान मोदींना यासंबंधी विनंती केली असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर मलेशिया येथे अडकलेल्या या विद्याथ्र्यांची कोण व कशी सोडवणूक करणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.