देश दुनिया

कोरोनाःचार राज्यांमधील स्थिती गंभीर

लॉकडाऊनच्या नियमांचे काही राज्यांमध्ये उल्लंघन होत असून केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. तसंच काही राज्यांमध्ये करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये रुग्ण वाढत असल्याने त्या राज्यांच्या सहकार्यासाठी केंद्राने पथके पाठवली आहेत. ही पथके राज्यांना उपयायोजना आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात मार्गदर्शन करतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले. यानुसार महाराष्ट्रातही केंद्राचे पथक दाखल झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून लॉकडाऊनवर सतत बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून जिथेही नियमांचे उल्लंघ होत आहे तिथे योग्य ती कारवाई केली जात आहे. गृहमंत्रालयाने काल राज्यांना पुन्हा एक पत्र लिहिले.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जे दिशानिर्देश जारी केले आहेत त्या दिशानिर्देशांचे राज्य सरकारांनी सत्तीनेपालन करावे. स्थानिक परिस्थितीनुसार राज्य सरकारे अधिक सत्तीने नियमांचे पालन करू शकतात. पण राज्यांनी नियमांचे पालन करताना कुचराई करू नये. सर्व राज्यांनी आणि सर्वाजनिक सेवेतील यंत्रणांनी आणि नागरिकांनी भारत सरकारने दिलेल्या आदेशाचे आणि नियमांचे देशाच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे पालन करावे, असे सुप्रीम कोर्टाने ३१ मार्चला दिलेल्या आदेश म्हटले आहे. याची आठवण राज्यांना पत्रातून करून देण्यात आली आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले. केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यावर त्याच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश राज्य सरकारांनादिले होते. पण काही राज्यांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. केंद्र सरकारचे नियम डावलून तिथे काही प्रमाणात सूट दिली गेली.

केरळ सरकारने केंद्राच्या आदेशात काही बदल करून नवीन दिशानिर्देश जारी केलेत. या दिशानिर्देशांच्या मुद्यावर गृहमंत्रालयाने पत्र लिहून केरळ सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. केरळ सरकारने काही व्यवहारांना परवानगी दिली आहे. जे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत येणाèया नियमांचे उल्लंघन आहे आणि लॉकडाऊनचे नियमही शिथिल होत आहेत. यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन व्हावे, अशी सूचना केरळ सरकारला करण्यात आली आहे.काही जिल्ह्यांमध्येही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यला धोका निर्माण होऊ शकतो. काही जिल्ह्यांमध्ये करोनाच्या संसर्ग वाढत असल्याने परिस्थिती गंभीर आहे किंवा गंभीर होत चालली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.