महाराष्ट्र

राज्यात २८३ नवे कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ४४८३वर

राज्यात आज कोरोनाचे २८३ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे करोनाबाधितांचा आकडा ४४८३ वर पोहोचला आहे. तर एकट्या मुंबईत १८७ रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज सकाळी ११ पर्यंत राज्यात २८३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत १८७ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील बाधितांची संख्या एकूण ४४८३वर पोहोचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.