देश दुनिया

भारतात कोरोना रूग्णांची संख्या १२ हजारावर

भारतात कोरोना रुग्णांची संख्या ११ हजार ९३३ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत ३९२ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. यापैकी १३४४ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. तर १० हजार १९७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशभरात लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही घोषणा केली. लॉकडाउनचे नियम आणखी कठोर होणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. दरम्यान आता करोनाग्रस्तांची संख्या ११ हजार ९३३ झाली आहे. भारतात करोना ग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या जवळ पोहचली आहे.

भारताच्या चिंतेत भर घालणारीच ही बातमी आहे. १० हजार १९७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातला लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर २० एप्रिलपर्यंत लॉकडाउनचेनियम अत्यंत कठोर करण्यात आले आहेत. त्यानंतर कुठे करोनाचे हॉटस्पॉट कमी झाले आहेत किंवा कुठे ग्रीन झोन आहे ते तपासलं जाणार आहे. देशभरात १७० जिल्हे हे करोनाचे हॉटस्पॉट आहेत. ज्या ठिकाणी करोनाचा शिरकाव झालेला नाही तिथे काही गोष्टी शिथील केल्या जातील मात्र लॉकडाउन कायम असेल असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.