
दिल्लीतील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता ३९ वर पोहोचली आहे. या ३९ रुग्णांमध्ये २९ रुग्ण हे प्रवास करून आलेले होते, तर इथर १० त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना संसर्ग झाला असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
राजस्थानात २ नवे रुग्ण
राजस्थानच्या भीलवाडामध्ये करोना विषाणूची लागण झालेले २ नवे रुग्ण आढळले आहेत. हे दोघे काल मृत्यू पावलेल्या करोनाग्रस्ताचे नातेवाईक आहेत. राजस्थानमध्ये आतापर्यंत ४५ जणांना करोनाची लागण झाली आहे.
मध्य प्रदेशात एकूण २१ रुग्ण
मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील एका रुग्णालयात आज एका करोना पॉझिटीव्ह रुग्णाला दाखल करण्यात आले. याबरोबरच मध्य प्रदेशातरुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे.
तामिळनाडूत ३ नवे रुग्ण
तामिळनाडूत गुरुवारी परदेशातून परतलेल्या एका २४ वर्षीय व्यक्तीसह एकूण तीन लोकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तामिळनाडूत एकूण रुग्णांची संख्या ३१ इतकी झाली आहे. पैकी एक रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला घरी जाऊ देण्यात आले आहे.
मिझोराममध्ये एक महिला अटकेत
देशात करोनाचा धोका वाढत असताना आपल्या कथित परदेश दौèयाहून येऊन देखील आपल्या प्रवासाबाबतची माहिती लपविणाèया एका ३३ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. या बरोबरच ओडिशामध्ये एकूण ३ रुग्ण असून बिहार राज्यामध्ये रुग्णांची संख्या ७ इतकी आहे.



