नवी दिल्ली (मवृसे) देशात करोना अत्यंत वेगाने आपले हाय-पाय पसरतो. आत्तापर्यंत देशात १८६०१ करोनाबाधित रुग्ण आढळले. दिलासादायक म्हणजे, आत्तापर्यंत ३२५२ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. केवळ सोमवारी एकाच दिवशी तब्बल ७०५ रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतलेत. हा देशातील आत्तापर्यंतच सर्वात मोठा आकडा आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनामुक्त होणाèया व्यक्तींच्या संख्येतही वाढ होताना दिसतेय, ही सकारात्मक बाब म्हणावी लागले. गेल्या काही दिवसांतील आकड्यांवर नजर टाकली तर १५ एप्रिल रोजी १८३ रुग्ण बरे झाले होते. त्यानंतर पुढच्याच दिवशी अर्थात १६ एप्रिल रोजी ही संख्या वाढून २६० वर पोहचली. १७ एप्रिल रोजी २४३ जणांनी, १८ एप्रिल रोजी २३९ जणांनी त १९ एप्रिल रोजी ३१६ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केल्याचे दिसते. तर २० एप्रिल रोजी अगोदरच्या दिवशीच्या दुप्पटीपेक्षा जास्त म्हणजे ७०५ जणांनी करोनावर विजय मिळवला.
राज्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येही हा आकडा मोठा आहे. महाराष्ट्रात एव्हाना ५७२ जणांनी, दिल्लीत ४३१ जणांनी तर केरळमध्ये ४०८ रुग्णांनी करोनावर मात केली. बिहारमध्ये ११३ पैंकी ४२ रुग्ण आता बरे झालेत. तर उत्तर प्रदेशात ११८४ पैंकी १४० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तामिळनाडूमध्ये हा आकडा ४५७, राजस्थान २०५, तेलंगणा १९०, मध्य प्रदेश १२७, गुजरात १३१ तर हरियाणामध्ये १२७ आहे.



