चंद्रपूर (का.प्र.) : गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे वाघाचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या मृत व्यक्तीचे नाव दिनकर ठेंगरे आहे. तोहोगांव येथे वास्तव्य करत असलेले दिनकर ठेंगरें हे नेहमीच शेतात जात असे. त्याचे शेत जंगलाला लागलेले आहे. काल दि. 27/06/2020 रोज शनिवारला नेहमी प्रमाणे शेतात गेले. सायंकाळ झाली तरी मात्र ते परत आलेच नाही. मग घरच्यांनी दिनकर चा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र कुठच त्यांचा पत्ता लागत नव्हता. आज सकाळी 8 वा. च्या सुमारास त्याचा मृतदेह जंगलात सापडला असून त्याचा शरीरावर वाघाचे हल्ले दिसून आले. ही घटना गावात कळताच गावकऱ्यांनी जवळच्या पोलिस स्टेशन व वन अधिकाऱ्याला फोन करून कळविले. ही घटना घडताच गावा लगत परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.
Related Articles
सावली तालुक्यातील तब्बल 40 विद्यार्थी झाले क्वारंटाईन
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहाड बुज. येथे तब्बल 40 विद्यार्थी झाले क्वारंटाईन चंद्रपूर (का.प्र ): सावली तालुक्यातील व्याहाड बूज येथे ट्यूशनक्लास मधील 1 विद्यार्थी निघाला कोरोना पॉझिटीव्ह;अन 40 विद्यार्थ्यांना व्हावं लागले क्वारंटाईन नवभारत विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आल्यांने माजली खळबळ ट्यूशन मधील सर्व विद्यार्थी व संबधीत शिक्षकांला केले क्वारंटाईन ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकाचा कोरोणा चाचणी अहवाल मात्र निगेटिव्ह […]
आज केवळ दोन पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 18 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 15 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 2 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 852 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 208 झाली आहे. सध्या […]
13 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले – रजिस्टर्ड पोस्टाने पाठवली टी सी घरपोच नारायणा विद्यालयम् चंद्रपूरचा तुघलकी निर्णय – पालकांचे आंदोलन
चंद्रपूर येथिल नारायणा विद्यालयम् ने तुघलकी निर्णय घेत शैक्षणिक शुल्क भरले नाही ह्या कारणाने शाळेतील 13 विद्यार्थ्यांना पालकांचे मत विचारात न घेता अथवा पालकांना कुठलीही सुचना न देता शाळेतून बेदखल केले असुन पालकांना आपले म्हणणे मांडता येऊ नये ह्या उद्देशाने त्या विद्यार्थ्यांच्या घरी थेट रजिस्टर्ड पोस्टाने टी सी पाठविण्याचा सुलतानी प्रकार केला असल्याची भावना पीडित पालकांनी […]


