चंद्रपूर जिल्ह्यातील उपचार घेत
असलेल्या बाधितांची संख्या 28
Ø आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा
Ø आतापर्यंत जिल्ह्यात 82 हजारांवर नागरिक परतले
Ø तीन हजारांवर नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत चंद्रपूर, दि. 28 जून: जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण कोरोना बाधितांची संख्या 81 आहे. यापैकी 53 बाधित कोरोना मुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या (ॲक्टीव्ह) बाधितांची संख्या 28 आहे.या 28 बाधितांपैकी 24 बाधित कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आले आहे. तर चार बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे.जिल्ह्याचा डबलींग रेट 14.0 आहे.
जिल्ह्यामध्ये आरोग्य सेतू ॲप अंतर्गत तीन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य सेतू ॲप वापरणे आवश्यक आहे. तसेच ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा नागरिकांनी 1921 क्रमांकाचा वापर करून डेटा असेसमेंट करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


