चंद्रपूर (का.प्र.) : गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे वाघाचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या मृत व्यक्तीचे नाव दिनकर ठेंगरे आहे. तोहोगांव येथे वास्तव्य करत असलेले दिनकर ठेंगरें हे नेहमीच शेतात जात असे. त्याचे शेत जंगलाला लागलेले आहे. काल दि. 27/06/2020 रोज शनिवारला नेहमी प्रमाणे शेतात गेले. सायंकाळ झाली तरी मात्र ते परत आलेच नाही. मग घरच्यांनी दिनकर चा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र कुठच त्यांचा पत्ता लागत नव्हता. आज सकाळी 8 वा. च्या सुमारास त्याचा मृतदेह जंगलात सापडला असून त्याचा शरीरावर वाघाचे हल्ले दिसून आले. ही घटना गावात कळताच गावकऱ्यांनी जवळच्या पोलिस स्टेशन व वन अधिकाऱ्याला फोन करून कळविले. ही घटना घडताच गावा लगत परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.
Related Articles
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी – मा.ना. सुधीर मुनगंटीवार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतातील तत्त्वज्ञानी महाराणी होत्या. त्यांनी बुध्दीचातुर्याच्या बळावर लोकाभिमूख कार्य करुन जनतेच्या कल्याणाकरिता कृतीशिल कार्य केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरल्या गेले आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वधर्म समभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता, शेतकरी, शेतमजूर यांचेकरिता उपयुक्त कार्य यासारख्या अनेक सामाजिक सुधारणा करुन लोककल्याणकारी कार्य केले […]
दोन आठवड्यात कामगारांचे वेतन न्यायालयात जमा करा…
उच्च न्यायालयाचे अधिष्ठाता यांना निर्देश : डेरा आंदोलनाला मोठे यश चंद्रपूर : मागील सोळा महिन्यापासून सुरू असलेल्या डेरा आंदोलनाबाबत 22 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. या सुनावणीत दोन आठवड्यात (6 जुलै)च्या आत कंत्राटी कामगारांचे वेतन न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.अशोक नितनवरे यांना दिले आहे. यामुळे […]
नॅनो युरिया व डीएपी खतांच्या वापराने होणार शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ चंद्रपूर : केंद्र शासनामार्फत सन-2022 पासून नॅनो युरीया व यावर्षीपासून नॅनो डीएपी या विद्राव्य खतांचा वापर वाढविण्याकरीता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरीता ईफको या सहकार क्षेत्रातील कंपनीद्वारे नॅनो युरीया व नॅनो डीएपी या विद्राव्य खतांचा वापर वाढावा, यासाठी […]



