चंद्रपूर (का.प्र.) : गोंडपिपरी:- तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील एका तरुण मुलाचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्या तरुण मुलाचे नाव अविनाश संतोष मडावी असे आहे. तो इयत्ता 11 वी ची परीक्षा दिला होता. तो सायंकाळी सहा ते सात च्या दरम्यान येनबोधला येथे तिघे जण मिळून काही कामानिमित्त गेले होते. जाऊन परत येताना येनबोधला येथील वास्तव्यास असणारे शालीकराव मैदनवार यांचा शेतातून येताना अविनाशला करंट लागल्याने जागीच जीव गेला. सायंकाळी अंदाजे सात ते आठ च्या दरम्यान ही घटना घडली. शालिकराव मैदनवार हे आपल्या शेतामध्ये डुक्कर मारण्याकरिता लाईन चे करंट लावून घरी गेले. त्याच वेळेस अविनाश मडावी व त्याचे दोन मित्र हे तिथून परत येत असताना न कळत अविनाशला करंट लागला. त्याला वाचवण्याचा त्याचा मित्रांनी प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. व अविनाश चा जागीच मृत्यू झाला. ही माहिती घरच्यांना कळताच धक्काच बसला. आता आमच्याशी मिळून बोलून गेला आणि अशी दुर्दैवी घटना घडली याचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या घरी आई – वडील व एक बहिण आहे. अविनाश हा त्यांचा घरात एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांच्या घरातील दिवाच मावळला. ही घटना विठ्ठलवाडा गावासाठी दुर्दैवी असून गावात आता शोककळा पसरली आहे.
Related Articles
एकाच दिवशी रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान
ना.मुनगंटीवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा पालकमंत्री महारक्तदान यज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद ना.मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून राजकारणात नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या विद्यमान कॅबिनेट व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस जिल्ह्यातील हजारो लोकांनी रक्तदान करून रविवारी साजरा केल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार तर्फे संपूर्ण जिल्ह्यात ना.मुनगंटीवार यांच्या […]
श्री सीद्देश्वर मंदिराचा होणार कायापालट-ना.मुनगंटिवार यांनी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे दिले संचालकांना आदेश.
राजुरा : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपुर व यवतमाळ जिल्ह्यातील देवस्थान व पर्यटनाशी संबंधित विविध विकास कामांसंबंधाने राज्याचे पर्यटन व कौशल्य विकास मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांचे समवेत सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे (14 सप्टेंबर 2022) रोजी आयोजित केलेल्या बैठकीत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने राजुरा […]
*बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये,*महावितरणचे आवाहन*
‘वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. अशा प्रकारचे कोणतेही ‘एसएमएस’ व व्हॉट्स अॅप मेसेज महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात […]



