चंद्रपूर (का.प्र.) : गोंडपिपरी:- तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील एका तरुण मुलाचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्या तरुण मुलाचे नाव अविनाश संतोष मडावी असे आहे. तो इयत्ता 11 वी ची परीक्षा दिला होता. तो सायंकाळी सहा ते सात च्या दरम्यान येनबोधला येथे तिघे जण मिळून काही कामानिमित्त गेले होते. जाऊन परत येताना येनबोधला येथील वास्तव्यास असणारे शालीकराव मैदनवार यांचा शेतातून येताना अविनाशला करंट लागल्याने जागीच जीव गेला. सायंकाळी अंदाजे सात ते आठ च्या दरम्यान ही घटना घडली. शालिकराव मैदनवार हे आपल्या शेतामध्ये डुक्कर मारण्याकरिता लाईन चे करंट लावून घरी गेले. त्याच वेळेस अविनाश मडावी व त्याचे दोन मित्र हे तिथून परत येत असताना न कळत अविनाशला करंट लागला. त्याला वाचवण्याचा त्याचा मित्रांनी प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. व अविनाश चा जागीच मृत्यू झाला. ही माहिती घरच्यांना कळताच धक्काच बसला. आता आमच्याशी मिळून बोलून गेला आणि अशी दुर्दैवी घटना घडली याचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या घरी आई – वडील व एक बहिण आहे. अविनाश हा त्यांचा घरात एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांच्या घरातील दिवाच मावळला. ही घटना विठ्ठलवाडा गावासाठी दुर्दैवी असून गावात आता शोककळा पसरली आहे.
Related Articles
धोका डेल्टा प्लस चंद्रपूर जिल्ह्यात आस्थापणाच्या वेळेत बदल.
Posted on Author Maha Vidarbha
धोका डेल्टा प्लस चंद्रपूर जिल्ह्यात आस्थापणाच्या वेळेत बदल […]
सोमनाथ ताडोबा सफारी गेटमुळे खुले झाले रोजगाराचे दालन-वनमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
Posted on Author Maha Vidarbha
जंगल सफारीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद चंद्रपूर – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोमनाथ सफारी गेटच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गेटच्या निमित्ताने तरुणांसाठी रोजगाराचे एक नवे दालन खुले झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवार) केले. मुल तालुक्यातील […]



