चंद्रपूर (का.प्र.) : गोंडपिपरी:- तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील एका तरुण मुलाचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्या तरुण मुलाचे नाव अविनाश संतोष मडावी असे आहे. तो इयत्ता 11 वी ची परीक्षा दिला होता. तो सायंकाळी सहा ते सात च्या दरम्यान येनबोधला येथे तिघे जण मिळून काही कामानिमित्त गेले होते. जाऊन परत येताना येनबोधला येथील वास्तव्यास असणारे शालीकराव मैदनवार यांचा शेतातून येताना अविनाशला करंट लागल्याने जागीच जीव गेला. सायंकाळी अंदाजे सात ते आठ च्या दरम्यान ही घटना घडली. शालिकराव मैदनवार हे आपल्या शेतामध्ये डुक्कर मारण्याकरिता लाईन चे करंट लावून घरी गेले. त्याच वेळेस अविनाश मडावी व त्याचे दोन मित्र हे तिथून परत येत असताना न कळत अविनाशला करंट लागला. त्याला वाचवण्याचा त्याचा मित्रांनी प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. व अविनाश चा जागीच मृत्यू झाला. ही माहिती घरच्यांना कळताच धक्काच बसला. आता आमच्याशी मिळून बोलून गेला आणि अशी दुर्दैवी घटना घडली याचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या घरी आई – वडील व एक बहिण आहे. अविनाश हा त्यांचा घरात एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांच्या घरातील दिवाच मावळला. ही घटना विठ्ठलवाडा गावासाठी दुर्दैवी असून गावात आता शोककळा पसरली आहे.
Related Articles
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात पोहचले आरोग्य संचालकांचे पथक,जाणून घेतल्या समस्या
गडचिरोली:- जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील खरतड डोंगरावर भागात पायदळी प्रवास करून भामरागड तालुक्याच्या बिनागुंडा पथक पोहोचले. प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य संचालकांचे पथक पोहोचल्याने या भागातील आदिवासींमध्ये हे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य संचालकांच्या पथकाने ह्या भागात दौरा करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आपला जीव धोक्यात घालून पायदळी प्रवास करून पुणे येथील आरोग्य संचालक डॉ. […]
यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडी विभागाच्या महिला शहर प्रमुख विमल काटकर, बहुजन विभागाचे बबलु मेश्राम, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज […]
आजचे कोरोना अपडेट
रविवारी एकही मृत्यू नाही, 3 कोरोनामुक्त, 3 पॉझिटिव्ह चंद्रपूर, दि. 22 ऑगस्ट : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 3 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 3 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड […]



