महाराष्ट्र

कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांना १७१ कोटींचा निधी-ना.वडेट्टीवार

 मुंबई (मवृसे)- कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य व औषधे खरेदी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना आतापर्यंत एकूण १७१ कोटी इतका निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कोवीड-१९ विषाणूचा राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणारा निधी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी […]

महाराष्ट्र

गो कोरोनाः राज्यात १३०० कंपन्यांना परवानगी

मुंबई (मवृसे) राज्य सरकारने काही अटी आणि शर्थीच्या आधारे उद्योगांना परवानगी दिली आहे. एमएडीसीकडे जवळपास ३००० कंपन्यांची नोंदणी आहे. त्यापैकी १३०० कंपन्यांना कामकाज पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली असल्याचे महामंडळाच्या अधिकाèयाने सांगितले. कारखाने, वस्त्रोद्योग, धातू उद्योग यातील कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या पुन्हा सुरु झाल्याने किमान २० हजार कामगारांच्या हाताला आता काम मिळणार आहे. यातील […]

महाराष्ट्र

राज्यात २८३ नवे कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ४४८३वर

राज्यात आज कोरोनाचे २८३ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे करोनाबाधितांचा आकडा ४४८३ वर पोहोचला आहे. तर एकट्या मुंबईत १८७ रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज सकाळी ११ पर्यंत राज्यात २८३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत १८७ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील बाधितांची […]

महाराष्ट्र

पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये

मुंबई (मवृसे) पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करूनये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते आज सोशल मिडीयाच्या […]

महाराष्ट्र

मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण

मुंबई (मवृसे) मुंबईत करोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार होत असून येथील प्रत्येक घडामोडीचे अपडेट्स मुंबईकरांपर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असणाèया विविध माध्यमांमधील पत्रकार आणि कॅमेरामन्सनाही करोना साथीने गाठले आहे. माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेनंतर आता अहवाल प्राप्त झाले असून त्यात मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन्स मिळून ५३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध पत्रकार […]

महाराष्ट्र

ग्रीन, आँरेज झोनमधील उद्योग अंशतः सुरू होणार; पण जिल्हाबंदी कायम -मुख्यमंत्री

मुंबई (मवृसे) राज्यात लॉकडाऊन जाहीर होऊन उद्या सहा आठवडे पूर्ण होत आहेत. या काळात करोनामुळे राज्याचं अर्थचक्र रुतले आहे. हे आर्थिक चक्र फिरलेच पाहिजे. त्यासाठी पुन्हा गणपती बाप्पा मोरया म्हटलेच पाहिजे, असे सांगतानाच करोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये येणाèया काही जिल्ह्यातील उद्योगांना माफक स्वरुपात परवानगी देण्यात येणार आहे. या जिल्ह्यात मालवाहतूक […]

महाराष्ट्र

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या २८०० पार

देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचे २१ दिवस उलटून गेल्यानंतरही करोनाचा संसर्ग थांबेनासा झाला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अधिकच बिकट असून येथील रुग्णांची संख्या आतापर्यंत २८०१ वर पोहोचली आहे. राज्यात आज ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एकट्या मुंबईतील ६६ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यातही आकडा वाढत असून आज आणखी ४४ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय, […]

महाराष्ट्र

लॉकडाऊन वाढल्यामुळे मजूर रस्त्यावर

मुंबई (मवृसे)- देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने मुंबईत त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्टेशनबाहेर धडक दिली असून स्टेशनबाहेर ठिय्या देऊन हे मजूर गावाला जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून जमावाला शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्र

२४ तासांत १८७ कोरोना रूग्ण सापडले

मुंबई (मवृसे) राज्यातील कोरोनाचे संकट काही कमी होताना दिसत नाही. राज्यात गेल्या २४ तासांत १८७ नवे कोरोना रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरी आव्हान आणखी वाढले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १८७ करोना रुग्ण आढळले असून त्यात आज दिवसभरात सापडलेल्या १३४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच गेल्या २४ तासांत १७ […]

महाराष्ट्र

ऑरेंज, ग्रीन झोनमधील लॉकडाऊन शिथिल होणार

मुंबई (मवृसे)कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार असून, १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. १५ पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज म्हणजे भगव्या पट्ट्यात येतील आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे हरित पट्ट्यात समाविष्ट होतील. या भगव्या आणि हिरव्या पट्ट्यांतील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू […]