महाराष्ट्र

ग्रीन, आँरेज झोनमधील उद्योग अंशतः सुरू होणार; पण जिल्हाबंदी कायम -मुख्यमंत्री

मुंबई (मवृसे) राज्यात लॉकडाऊन जाहीर होऊन उद्या सहा आठवडे पूर्ण होत आहेत. या काळात करोनामुळे राज्याचं अर्थचक्र रुतले आहे. हे आर्थिक चक्र फिरलेच पाहिजे. त्यासाठी पुन्हा गणपती बाप्पा मोरया म्हटलेच पाहिजे, असे सांगतानाच करोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये येणाèया काही जिल्ह्यातील उद्योगांना माफक स्वरुपात परवानगी देण्यात येणार आहे. या जिल्ह्यात मालवाहतूक सुरू राहिल, दोन जिल्ह्यांमध्ये मालवाहतूक करता येणार नाही. तसेच सर्व सामान्यांसाठीही जिल्हाबंदी कायम राहणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी फेसबुकवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनाच्या संकटाची नागरिकांना जाणीव करून देतानाच राज्यासमोरच्या आर्थिक संकटाचीही जाणीव करून दिली. गेल्या महिन्यात २० तारखेला सर्व ठप्प झाले होते.

आपले अर्थचक्र त्यानंतर करोनाच्या संकटात रुतले. हे अर्थचक्र फिरलेच पाहिजे. त्यासाठी उद्यापासून काही ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा मोरया म्हणावेच लागेल. आपण करोनाच्या पाश्र्वभूमीवर तीन झोन तयार केले आहेत. त्यापैकी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये माफक प्रमाणात उद्योग सुरू करता येईल. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात मालाची ये-जा करता येईल. पण कुणालाही एका जिल्ह्यातून दुसèया जिल्ह्यात जाता येणार नाही. जिल्हाबंदी कायम असेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच कामगारांची कारखान्याच्या आवारात काळजी घेत असाल तर राज्य सरकार तुम्हाला मदत करेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.