महाराष्ट्र

महाराष्ट्र लॉकडाऊन, जमावबंदी लागू

। मुंबई दि. २२ । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्या सकाळपासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन राहणार आहे. या काळात मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील सर्व नागरी भागांत १४४ लागू करण्यात आले आहेत. याचाच अर्थ राज्यात लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पोर्शभूमीवर आज पुन्हा एकदा राज्याला संबोधित केलं. यात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात कलम १४४ अर्थात जमावबंधी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिगद्वारे याबाबत माहिती दिली.

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाच्या पोर्शभूमीवर सरकारकडून ऐतिहासिक आणि मोठे निर्णय घेतले जात आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या कमीत कमी qकबहुना थांबवायची आहे आणि म्हणून उद्या सकाळपासून मुंबई, qपपरीqचचवड आणि नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण नागरी भागामध्येभागामध्ये १४४ कलम नाईलाजाने लावत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्यापासून नागरी भागात जमावबंदी लागू. जीवनावश्यक वस्तू चालू राहतील. वीज पुरवठा, बँका आणि त्यासंबंधी व्यवहार चालू राहतील. पण जिथे वर्क फ्रॉम होम शक्य तिथे करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. उद्यापासून पुढचे काही दिवस अधिक दक्षतेनेपार पाडायचे आहेत. सातत्याने मी आपल्याला सांगत आहे, आपण आता संवेदनशील टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *