महाराष्ट्र

कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांना १७१ कोटींचा निधी-ना.वडेट्टीवार

 मुंबई (मवृसे)- कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य व औषधे खरेदी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना आतापर्यंत एकूण १७१ कोटी इतका निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कोवीड-१९ विषाणूचा राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणारा निधी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी कराव्या लागणाèया उपाययोजनांवर खर्च करता येतो का याबाबतीत आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची ना.वडेट्टीवार यांनी बैठक घेतली.

यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी चर्चा करून विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्तांना आतापर्यंत १७१ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती ना.वडेट्टीवार यांनी दिली. ना. वडेट्टीवार म्हणाले, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे पसरलेला आजार नियंत्रित करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना आज ८१ कोटी इतका निधी उपलब्ध करून (पान ५ वर)दला असून हा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले असून याबाबत दिनांक २१ एप्रिल रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी ४० कोटी, पुणे विभागासाठी १५ कोटी, नागपूरसाठी १० कोटी, अमरावतीसाठी ६ कोटी तर औरंगाबाद विभागासाठी १० कोटी, याप्रमाणे एकूण ८१ कोटींचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

पहिल्या टप्यात कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागासाठी १५कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावती विभागासाठी ५ कोटी, औरंगाबाद विभागासाठी ५ कोटी, नाशिक विभागासाठी ५ याप्रमाणे ४५ कोटी निधी वितरीत करण्यात आलेला आहे. तर दुसèया टप्यात कोकण विभागासाठी १५कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावती विभागासाठी ५ कोटी, औरंगाबाद विभागासाठी ५ कोटी, नाशिक विभागासाठी ५ याप्रमाणे ४५ कोटी निधी वितरीत करण्यात आलेला आहे. असे एकूण ९० कोटी आणि तिसèया टप्यात ८१ कोटी असे आतापर्यत एकूण १७१ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती ना.वडेट्टीवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *