चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूरला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या बाहेरून येणाèया प्रत्येक नागरिकाला १४ दिवसांच्या संस्थात्मक कॉरेन्टाइनला (इन्स्टिट्यूशनल ) ठेवणे सुरू केले आहे. जिल्ह्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. ७८ पैकी ७७ नमुने निगेटिव्ह आले आहे. १२३ लोकांना सध्या इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात गरीब निराश्रित यांच्या अन्नधान्य पुरवठा सोबतच २४ तारखेपासून केशरी शिधापत्रिका असणाèयांना देखील अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांची व्हिडिओ संदेश द्वारा आज जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी संपर्क साधला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने आणू नका पुढील ३ मेपर्यंत लॉकडाऊन काटेकोरपणे पाळा आणि प्रशासनाचे कान डोळे होत बाहेरून येणाèया प्रत्येक नागरिकाची माहिती द्या,असे आवाहन त्यांनी आजच्या ताज्या व्हिडिओमध्ये केले आहे.
जिल्हा ग्रीन झोन मध्ये असला तरी एक रुग्ण जिल्ह्याला धोक्यात आणू शकतो. त्यामुळे कोणताही धोका पत्करू नका. घरातील एकाच सुदृढ नागरिकांनी बाहेर पडून जीवनावश्यक वस्तू घरी घेऊन जाव्यात. केशरी शिधा पत्रिकाधारकांना २४ एप्रिल पासून मे महिन्याचे धान्य वाटप होत आहे. प्रतिव्यक्ती ८ रुपये दराने ३ किलो गहू व प्रतिव्यक्ती १२ रुपये दराने २ किलो तांदूळ वितरित केल्या जाणार आहे. पुढील एक-दोन दिवसातशहरांप्रमाणे गावात देखील एखादा रुग्ण आढळल्यास संपूर्ण गाव बंदी करण्याची रंगीत तालीम अर्थात मॉक डिड्ढल केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक गावाच्या सरपंचांना सचिवांना गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. यासाठी आपल्या दारात येणाèया आरोग्य कर्मचाèयाला सन्मानाची वागणूक व सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहनही त्यांनी आज केले आहे. प्रीपेड मोबाईल धारकांना संपर्कामध्ये बाधा येऊ नये. यासाठी केंद्र सरकारच्या निर्णयानुसार मोबाईल रिचार्ज प्रतिष्ठाने सुरू करण्यात येत आहे. सोबतच हार्डवेअरची दुकाने सुद्धा उघडण्यात येत आहे. उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने उघडी असतील.



