नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभरातील नागरिकांनी आज रविवारी संध्याकाळी ५ वाजता ५ मिनिटांसाठी भांडी, घंटा, शंख आणि टाळ्या वाजवून करोना विषाणूविरोधात लढणाèया लोकांचा सन्मान केला. या बरोबरच देशभरातील लोकांनी पंतप्रधानांनी आवाहन केल्या प्रमाणे ‘जनता कफ्र्यूला‘ देखील भरभरून समर्थन दिले. आज संध्याकाळी ५ वाजता, भांडी, टाळ्या आणि शंखाचा नाद देशभरात गुंजला. […]
Author: Maha Vidarbha
देशात कोरोनामुळे सातव्या मृत्यूची नोंद
। नवी दिल्ली दि. २२ । कोरोना व्हायरसमुळे भारतात आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातच्या सुरतमध्ये करोनाची लागण झालेल्या ६९ वर्षांच्या माणसाचं निधन झालं आहे. यासोबत करोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे. बडोद्याच्या रुग्णालयातही एका ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे, पण या महिलेचे करोनाचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. गुजरातच्या आरोग्य विभागाने ही […]
छत्तीसगडच्या सुकमामध्ये १७ जवान शहीद, १४ जखमी
। सुकमा , दि. २२ । देश कोरोनाच्या महामारीशी सामना करत असताना नक्षलवाद्यांनी आपला डाव साधत छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला केला आहे. सुकमामध्ये नक्षल्यांच्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले आहेत तर १४ जवान जखमी झाले आहेत. काल शनिवारी सुकमामधील qचतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला. हे जवान शोध मोहिमेवरुन परतत होते. या हल्ल्यात १७ […]
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 6 जणांची वाढ, राज्यातील एकूण आकडेवारी 122 वर पोहचली
देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात सुद्धा शिरकाव केला आहे. तर महाराष्ट्रातील सरकारने सुद्धा लॉकडाउन लागू केला असून अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांना दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही नागरिक अत्यावश्यक सेवासुविधांची साठवणूक करत असल्याचे दिसून आली. त्यामुळे नागरिकांची किराणामाल किंवा मार्केटमध्ये गर्दी दिसली. परंतु कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घ्या असे वारंवार सांगण्यात येत आहे. तरीही […]
महाराष्ट्रात 5 नवे कोरोना बाधित; 112 जण COVID 19 पॉझिटिव्ह
भारतासह महाराष्ट्रात वाढत असलेला कोरोना व्हायरसचा धोका आता चिंतेमध्ये वाढ करत आहे. आज महाराष्ट्रात 5 नव्या रूग्णांची COVID 19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता हा आकडा 112 पर्यंत पोहचला आहे. तर देशामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 562 पर्यंत येऊन ठेपला आहे. दरम्यान आता हे संकट अधिक गंभीर होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून आज (25 मार्च) पासून पुढील 21 […]
गडचिरोलीत जमावबंदी आदेश झुंगारून लोक रस्त्यावर; बँकेच्या गेटवर ग्राहकांच्या रांगा
प्रतिनिधी गडचिरोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात १४४ कलम लावून जमावबंदी लागू केली. मात्र, गडचिरोलीत जमावबंदी आदेशाला झुगारून लोक रस्त्यावर फिरत असून शहरातील अनेक राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. अखेर सोमवारी (दि.२३ मार्च) सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार २२ मार्च रोजी […]
धान खरेदीवर ‘कोरोना’चे सावट
प्रतिनिधी चंद्रपूर : काही दिवसांपासून कोरोना विषाणूची दहशत पसरली आहे. यामुळे अनेक शेतकºयांना शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान आणण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे धान खरेदीची अंतिम तारीख एक महिन्याने वाढवून द्यावी, अशी मागणी खा. बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. शेतकºयांच्या धानाला योग्य मोबदला मिळावा, केलेल्या खर्चाच्या मोबदल्यात दोन पैसे अधिक मिळावे म्हणून […]
पोलिसांनी उधळला घातपाताचा कट
प्रतिनिधी गडचिरोली : जिल्ह्यातील हेडरी उपविभागांतर्गत बोडमेटा जंगल परिसरात रविवारी जिल्हा पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांचा हल्ला परतवून लावत घातपाताचा कट उधळून लावला. यावेळी भूसुरुंग स्फोट घडविण्यासोबतच दोन्ही बाजूने गोळीबार झाला. पण कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, हेडरी पोलीस आणि सीआरपीएफ बटालियन १९१ च्या कंपनी सी चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित […]
प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे : डॉ.कुणाल खेमणार
प्रतिनिधी चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी केले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मा.सा.कन्नमवार सभागृह जिल्हा […]
‘कोरोना’बाबत जिल्ह्यात सर्व ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
प्रतिनिधी गडचिरोली : कोरोनाबाबत जिल्ह्यात सर्व प्रशास नाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सूरू करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच प्रशासनाची मदत घेवून कामांचे वाटपही करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रशास […]










