
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभरातील नागरिकांनी आज रविवारी संध्याकाळी ५ वाजता ५ मिनिटांसाठी भांडी, घंटा, शंख आणि टाळ्या वाजवून करोना विषाणूविरोधात लढणाèया लोकांचा सन्मान केला. या बरोबरच देशभरातील लोकांनी पंतप्रधानांनी आवाहन केल्या प्रमाणे ‘जनता कफ्र्यूला‘ देखील भरभरून समर्थन दिले. आज संध्याकाळी ५ वाजता, भांडी, टाळ्या आणि शंखाचा नाद देशभरात गुंजला. आम्ही करोना विषाणूशी लढण्यासाठी वचनबद्ध आहोत, असा संदेश भारतीयांनी आपल्या या कृतीतून आज दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नागरिकांनी दिलेल्या समर्थनाबाबत जनतेचे आभार मानले. ‘हा धन्यवादाचा नाद आहे. मात्र, याबरोबरच हा एका दीर्घ लढाईतील विजयाच्या सुरुवातीचा नाद आहे. याच संकल्पासह, याच संयमासह आपण स्वत:ला एका दीर्घ लढाईसाठी स्वत:ला बंधनात बाधून घेऊ या.‘, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.




