
प्रतिनिधी चंद्रपूर : काही दिवसांपासून कोरोना विषाणूची दहशत पसरली आहे. यामुळे अनेक शेतकºयांना शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान आणण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे धान खरेदीची अंतिम तारीख एक महिन्याने वाढवून द्यावी, अशी मागणी खा. बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. शेतकºयांच्या धानाला योग्य मोबदला मिळावा, केलेल्या खर्चाच्या मोबदल्यात दोन पैसे अधिक मिळावे म्हणून केंद्र शासन आधारभूत किंमत खरेदी ठेव योजना राबविते. योजनेअंतर्गत शासन शेतकºयांच्या पिकांना किमान आधारभूत किंमत जाहीर करून निश्चित केलेल्या केंद्रावर धान खरेदी करीत असते. खरीप हंगाम २0१९-२0 अंतर्गत शासनाच्या सहकार पणन महासंघाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निर्माण केलेल्या आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर १ आॅक्टोबर २0१९ पासून धान खरेदी करण्यात सुरुवात केली.
अ प्रतीच्या धानास १८३५ रुपये तर साधारण धान पिकास १८१५ रुपये अधिक ५00 रुपये प्रोत्साहनपर वाढ देण्याचे निश्चित केले. त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकºयांनी १ आॅक्टोबर २0१९ पासून आजपर्यंत हजारो क्विंटल धान स्थानिक हमीभाव खरेदी केंद्रावर विकला आहे. असे असले तरी नैसर्गिक वातावरण, तांत्रिक अडचण आणि कौटुंबिक कामाच्या व्यापामुळे तालुक्यातील अनेक शेतकºयांना हमीभाव केंद्रावर धान विकण्यास वेळ मिळालेला नाही. कामाच्या दगदगीत वेळ काढून शेतकरी धानपीक केंद्रावर विकण्यासाठी धडपड करीत असतानाच काही दिवसांपासून कोरोनाची दहशत पसरली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी या रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजना म्हणून ३१ मार्चपर्यंत बाजार समिती परिसरात धान खरेदी विक्री व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. अशा परिस्थितीत ३१ मार्च २0२0 या धान खरेदी करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शेतकºयांना धान केंद्रावर आणण्यास मोठया प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही वास्तविकता लक्षात घेऊन शासनाने कार्यान्वित केलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २0२0 ऐवजी ३0 एप्रिल २0२0 पर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणीही धानोरकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.



