चंद्रपूर,दि. 15 मे: जिल्ह्यामध्ये बाहेर राज्य, इतर जिल्हातून नागरिक येत आहे.परंतु,रेड झोन किंवा ऑरेंज झोन मधुन नागरिकांना आणण्यासाठी गेलेल्या वाहनाचे वाहन चालक यांना कॉरेन्टाइन करण्याची भिती होती. हि भिती प्रशासनाने दूर केली असून आता अशा वाहन चालक तसेच वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी, परिचारीका, डॉक्टर व शासकीय कामांसाठी विहीत कार्यपध्दतीनुसार अधिकृतरित्या परवानगीसह जाणारे अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना विषाणूंची कोणतेही लक्षणे आढळून न आल्यास त्यांना संस्थात्मक किंवा गृह अलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य नसणार आहे,असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात अडकलेले नागरीक सद्यस्थितीत जिल्ह्यात परत येत आहेत. यापैकी बरेचसे नागरीक हे रेड झोन एरियातुन येत असल्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी बाहेरुन आलेल्या नागरीकांना अलगीकरण (कॉरेन्टाईन) करण्याचे बाबतीत कार्यप्रणाली निश्चित करण्यात येत आहे,अशी माहिती परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली आहे.



