चंद्रपुर

शहरातील वस्त्यांमध्ये जमा होतात नागरिकांचे घोळके

चंद्रपूर (का.प्र.)कोेरोना या जिवघेण्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसाचे लॉकडाऊन केले. देशातील जनतेला घरातून बाहेर न निघण्याचे हात जोडून विनंती सुध्दा केली. मात्र अजूनही कित्येक परिसरातील जनतेच्या डोक्याच्या वरून गेल्यासारखे मुख्य रस्ते वगळता शहरातील वस्त्यांमध्ये चौकात नागरिकांचे घोळके बघायला मिळत आहे. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे. चंद्रपुरात अजुन एकही पॉझिटीव रूग्ण मिळाला नाही हे आपले भाग्य आहे. मात्र नागरिकांनीस्वतःच्या व इतरांच्या रक्षणासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्यालाही या विषाणूचा भुर्दंड भरायची वेळ येऊ शकते.

हे लक्षात घेता सोशल डिस्टंqसगला महत्व देणे गरजेचे आहे. काही सुज्ञ नागरिकांनी सांगितल्यास त्याला उलट उत्तर दिल्या जात असून अशा घोळक्यांचे प्रमाण वाढत आहे. तेव्हा प्रशासनाने वस्त्यांमध्ये गस्त करून अशा घोळक्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासन रात्रंदिवस स्तुत्य कामगिरी करत असून जनतेच्या भल्ल्यासाठीच लावण्यात आलेल्या कफ्र्यूचे उल्लंघन करणारे भरपूर प्रमाणात आहे. मात्र अशांना पोलिसी खाक्या दाखवल्याशिवाय गय नाही. शहरातील अनेक युवक टवाळक्या करत तोंडाला रूमाल अथवा मास्क न बांधता फिरत असून अशांना त्यांच्याच अंगावरील शर्ट काढून त्यांच्या तोंडाला बांधून घरी पाठवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *