
चंद्रपूर (का.प्र.)इंडियन मेडिकल आडोसिएशन ने डॉक्टर्स व आरोग्य रक्षकांवर होणारे हल्ले लक्षात घेता उद्या २२ एप्रिल (बुधवार) ला मेणबत्तीचा उजेड करून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही तर २३ तारखेला,काळी फित लावून गुरुवार (२३ एप्रिल)ला संपूर्ण देशात काळा दिवस साजरा केला जावा, असा निर्णय आय एम ए ने घेतला आहे. अशी माहिती आयएमए, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी दिली आहे.देशावर कोरोना महामारीचे संकट यमरूप धारण करून आहे.अश्यात डॉक्टर्स व आरोग्यसेवेतील योध्ये जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. तरीही या लोकांवर हल्ले चढविले जात आहेत.
या प्रकारामुळे डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यातील सुसंवाद धोक्यात आला आहे. संपूर्ण देशात अश्या घटनांची वाढ होत असताना डॉक्टर्स व आरोग्य रक्षकांचे रक्षण व्हावे असा कोणताच केंद्रीय मध्यवर्र्ती कायदा अस्तित्वात नाही म्हणून हल्लेखोरांचा फावत आहे. काही दिवसांपूर्वी इंदोरला डॉक्टरांच्या चमूवर दगडफेक करण्यात आली तर आता चेन्नई येथे लोकांची सेवा करताना कोरोनाग्रस्त होऊन हुतात्म्य आलेल्या डॉक्टर्सच्या अंत्यविधित अडथळा निर्माण करण्यात आला. हल्लेखोरांनी त्या शववाहिकेची तोडफोड केली. असेच चालत (पान ५ वर) राहिले तर अशी राष्ट्रीय आपत्ती आल्यावर कोण सेवा देईल? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. याकडे केंद्र शासनाने गांभीर्याने लक्ष पुरवावे व कायदा अस्तित्वात आणावा म्हणून उद्या बुधवार ला रात्री ९ वाजता मेणबत्तीच्या उजेड करून शासनाचे लक्ष वेधण्यात येईल. याची दखल घेतल्या गेली नाही तर गुरुवारी २३ एप्रिल ला दिवसभर काळी फित लावून काळा दिवस साजरा केला जाईल अशी माहिती डॉ गुलवाडे यांनी दिली आहे. चंद्रपूर जिल्यातील सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाèयांनी केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयएमए चे अध्यक्ष डॉ.किरण देशपांडे, भावी अध्यक्ष डॉ.अनिल माडूरवार व सचिव डॉ.नसरीन मवानी यांनी केले आहे.



