चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्ती शेकडो गावांमध्ये कोरोना मुक्तीचा लढा ग्रामपातळीवर भक्कमपणे लढला जात आहे. गावात रेड झोन जिल्ह्यांमधून येण्यास निर्बंध टाकले आहे. मात्र चुकून आलेल्या नागरिकांना गावातील शाळांमध्ये हे निवासी ठेवले जात असून तपासणी केल्यानंतरच गावात प्रवेश दिला जात आहे. शहरांप्रमाणेच गावात देखील ग्राम दक्षता दल सक्रिय झाले असून सुरक्षा, तपासणी, मदत, निर्जंतुकीकरण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यासंदर्भात आज जिल्ह्यातील शेकडो सरपंचाशी संवाद साधला.
चंद्रपूर जिल्ह्यातील १८३६ गावांमध्ये कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. त्यातही सीमावर्ती भागामध्ये तेलंगाना राज्य, नागपूर,यवतमाळ आदी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून कोणीही सिमांमध्ये येऊ नये, चुकून गावात आल्यास त्यांना कॉरेन्टाईन करणे, गावांमध्ये येणार यांची यादी तयार करणे, फवारणीकरणे, ग्रामपंचायत स्तरावर समिती स्थापन करणे, गावात साबण वाटप करणे, हात धुण्याचे महत्त्व पटवून देणे, गावात पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे, गावांमधील असंघटीत मजुरांची माहिती घेणे, गावातील असंघटीत मजुरांसाठी धान्य उपलब्ध करणे, परराज्यातील व अन्य मजुरांची राहण्याची व्यवस्था करणे, जिल्हा व तालुका कोरोना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू पुरवठादार यांची यादी प्रसिद्ध करणे, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये १ मीटरचे अंतर राखणे गावांमध्ये स्वच्छता करणे आदी १७ घटकांची पूर्तता प्रत्येक गावाला करणे आवश्यक आहे. याशिवाय आरोग्यविषयकसर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाèयांकडे देण्यात आली आहे. गावागावात उपलब्ध करून देण्यात आलेल्या मेगाफोन वरून कोरोना संदर्भात रोज नव्या सूचनांची दवंडी चंद्रपूरच्या गावागावांमध्ये दिल्या जात आहे.
याशिवाय जिल्ह्यातील ५२ चेक पोस्टवर २४ तास आरोग्य पथक तैनात असून प्रत्येकाची तपासणी याठिकाणी केली जाते पोलिसांकडून कोणालाच प्रवेश दिला जात नाही.परवानगी घेऊन गेलेल्यांची देखील तपासणी करूनच त्याला आत मध्ये सोडल्या जाते. तसेच प्रत्येक चेक पोस्टवर निर्जंतुकीकरण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. बाहेरून मालवाहतूक वा अन्य काही ही वाहतूक करणाèया वाहनांचे देखील निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. आत मध्ये येऊन परत जाणाèया वाहनधारकांच्या चालकांना कोणाशीही संपर्क येणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जात आहे.
गावातील प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गावातील बचत गट सक्रिय झाले असून मास्क सोबतच साबणाचे देखील वाटप केले जात आहे. याशिवाय निर्जंतुकीकरण प्रक्रिया, हात स्वच्छ धुणे ,मास्क कसे वापरायचे याबाबतचे देखील समुपदेशन केले जात आहे. गावागावातील शाळांमध्ये आवश्यकता पडल्यास बाहेरून येणाèया नागरिकांना कॉरेन्टाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी १४ दिवसांपर्यंत गरज पडल्यास कॉरेन्टाईन केले जाते. आज जिल्ह्यातील सर्व सरपंच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे मुख्य लेखाधिकारी अशोक मातकर यांनी संपर्क साधून सूचना केल्या उद्या पुन्हा काही सरपंचांची संपर्क साधला जाणार आहे.
गावागावातील आपले सरकार केंद्रांमधून सरपंचांनी व ग्रामपंचायत सचिवांनी हा संवाद केला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून ८५ नागरिकांची नोंद करण्यात आली. ७७ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ७६ नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. १ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या ३० हजार ७२५ आहे. यापैकी २ हजार ५२४ नागरिक निगराणीखाली आहेत. तर १४ दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २८ हजार २०१ आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ११२ आहे. नियमांचे पालन न करणाèया नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील १९८ प्रकरणात एकूण ११ लाख ७३ हजार २७० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.यामध्ये नियमांचे पालन न करणाèया ५८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर ७१४ वाहने जप्त केली आहेत.
प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणाèयांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी अतिशय महत्वाचे असलेले आरोग्य सेतू अॅप अॅन्डडड्ढाईड मोबाईलवर डाऊनलोड करावे. यात सोपे ४ प्रश्न नागरिकांना विचारले जातील. आपण आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहोत की असुरक्षित, हे या अॅपमध्ये कळते. तसेच देशातील कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेता येते. एकप्रकारे या अॅपद्वारे आपण स्वत:चे डॉक्टर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हे अॅप त्वरीत डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास ०७१७२- २५३२७५, ०७१७२-२६१२२६ या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या ०७१७२-२७०६६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी ०७१७२-२५१५९७, टोल फ्री क्रमांक १०७७ यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाèया वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या ०७१७२-२७२५५५ या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक १५५-३९८ वर दूरध्वनी करावा.



