पुलगाव देवळीचे आमदार रणजीत कांबळेनि परिस्थितीचे गांभीर्य सांगितले
शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदद करा अजित पवार भडकले सरकारवर
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधिपक्ष नेते अजित पवार यानी आज २९ जुलैला हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिच्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी परीसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला व झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेत आपण सरकार कडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्याची मागणी करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. वर्धत पत्रकार सी संवाद साधताना हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर शक्य असेल जास्तीत जास्त मदद करा असे खडे बोल वर्तमान महाराष्ट्र सरकार ला त्यांनी बजावून सांगितले यावेळी गावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त प्रा . वीनोद मूडे,माजी सरपंच गजू नरड,माजी उप सरपंच ईस्माईल खाँ . पठान ,नाना लोन्हारे,वासुदेव कोडापे,उप सरपंच वीजय कवडे,ग्रा . प . सदस्य सचीन पारसडे,सतीश काळे,निखील खाडे,अभी घूसे,प्रमोद नरड,मनोहर मेघरे,प्रवीन गोठे,व आदी गामस्थ मोठया संखेने उपस्थीत होते.





