चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मोटरसायकल वरून खाली पडल्याने युवकाचा मृत्यू

राजुरा : राजुरावरून  देवाडा जात अस्थाना  तेलंगाना राज्यात जनारे राष्ट्रीय महामार्गावर  वन विभागाच्या बगीचा सामोरील मार्गावर असलेल्या खड्ड्यात मोटरसायकल  वरून नियंत्र सुटल्याने  युवक खाली पडल्याने डोळ्याला गंभीर दुखतात झाली यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतकाचे  नाव  सचिन पांडुरंग शेंडे वय (35)  रा. सोमनाथपूर, राजुरा असे आहे.  मृतक आपल्या मोटरसालयक दुचकी क्र.  MH 34 CA 1628 ने सकाळी 9:30 वाजता राजुरावरून देवाडा कामानिमित्ताने जात असताना वन विभागाच्या बगीचा समोर खड्ड्या चुकवताना मोटरसायक दुचकी वरून नियंत्र सुटल्याने खाली पडला यात त्याच्या डोक्याला जबर जखम झाली,त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु आज दुपारी उपचारादरम्यान त्याच्या रुग्णालयात मृत्यू झाला. राजुरा तेलंगाना राज्यात जनारे राष्ट्रीय महामार्गावर चौपदरी मंजूर झाला पासून वारंवार सदर खड्ड्याबाबत बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होऊनही संबधित विभागाचे अधिकारी  दुर्लक्ष होत आहे.  दरम्यान आज एक निष्पाप युवकाचा  मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.