
मुंबई (मवृसे)हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी मुंबईत निधन झाले. एच.एन. रिलायन्स रुग्णालयात सिनेसृष्टीवर गारूड करणाèया या कलाकाराची अखेर झाली. ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर मुंबईतील चंदनवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लॉकडाउनमुळे त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यासह मोजकेच लोक अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होते.मुंबईतील चंदनवाडी येथील स्मशान भूमीत ऋषी कपूरयांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला संपूर्ण कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
ऋषी कपूर यांचे भाऊ रणधीर कपूर, पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर, आलिया भट्ट, करिना कपूर, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, अरमान जैन, चित्रपट निर्माते आयान मुखर्जी आणि इतर मान्यवर हजर होते. अभिनयाचा ठसा उमटणारा प्रतिभावंत ऋषी कपूर यांनी अभिनयाच्या करिअरची सुरुवात वडिल राज कपूर यांच्या चित्रपटात काम करत केली होती. ‘मेरा नाम जोकर‘ या चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी‘ चित्रपटातील भूमिकेनंतर ऋषी कपूर खèया अर्थाने प्रकाश झोतात आले. त्यांच्या या भूमिकेने त्यांनी अनेकांच्या मनावर राज्य केले.



