
घुग्गुस(ता. प्र ) येथून जवळच असलेल्या नकोडा गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४ ते ५ महिन्यापासून अत्याचार करणाऱ्या आरोपीला घुग्गुस पोलिसांनी पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. संजय भाऊराव नवले असे आरोपीचे नाव आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी घुग्गुस पोलीस स्टेशनला भेट दिली. या घटनेचा पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.



