

महोत्सवाचा दुसरा दिवस – मॅरेथॉन, महाआरोग्य शिबिर, गृहमंत्री, मधुरगीतांची मेजवानी
ब्रम्हपुरी – समाजात जन्मलेल्या प्रत्येकाला समाजाचे देणे असते. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करणाऱ्यांपैकी मी नसून एक प्रामाणिक प्रतिनिधी म्हणून त्यांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्याचे आद्य कर्तव्य ही माझेच आहे. समाजातल्या दुर्बल घटकांना आरोग्य सेवा देणे हे लोकप्रतिनिधित्वातून मिळालेली जनसेवेची हि संधी म्हणजे समाज ऋण चुकविण्याचा मार्गच आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी केले ते ब्रह्मपुरी महोत्सवानिमित्त आयोजित महा आरोग्य शिबिरास अध्यक्ष म्हणून बोलत होते. मोहत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भव्य मॅरेथॉन स्पर्धेत लहान मोठे, वृद्ध, महिला युवक, युवती धावल्याने अख्खे ब्रह्मपुरी शहर धावल्याचे चित्र निर्माण झाले होते. तर दुसरीकडे ब्रह्मपुरी महोत्सवाच्या निमित्ताने पंचशील वस्तीगृहाच्या पटांगणावर आरोग्याचे धाम भरले होते.ब्रह्मपुरी शहराला सांस्कृतिक,क्रीडा, व आरोग्य वैभव प्राप्त झाले आहे. या वैभवांना ब्रह्मपुरी महोत्सव सातत्याने चालना देण्याचे काम करीत आहे. शुक्रवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ख्रिस्तनंद चौक ते ब्रह्मपुरीचे तंत्रनिकेतन महाविद्यालयापर्यंत भव्य मॅरेथॉन स्पर्धेने संपूर्ण शहर धावल्याचे चित्र जणू निर्माण झाले होते. स्वतः आयोजक आ. विजय वडेट्टीवार, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका यांचा जणू मेळच त्या रस्त्यावर दिसत होता. तर तर दुपारी बारा वाजता स्थानिक पंचशील वस्तीगृहाच्या प्रांगणावर दंतचिकित्सक कॅन्सर निदान, याकरिता विशेष अत्याधुनिक यंत्रासह निर्माण केलेली व्हॅनला पाचारण करण्यात आले होते.तर डोळ्यांचे आजार, तपासणी करिता नागपूर येथील प्रसिद्ध महात्मे रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होटीम पोटाचे आजार, इत्यादींवर मुंबई,पुणे, नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याचा धाम भरल्याचे चित्र निर्माण झाल्याने दुसऱ्या दिवशीही ब्रह्मपुरी महोत्सव फुलला होता. आयोजित महा आरोग्य तपासणी शिबिरात 2 हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. महोत्सवाच्या दुपारच्या सत्रात सामाजिक कार्यकर्त्या किरण विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या सिने अभिनेते आदेश बांदेकर यांचा गृहमंत्री हा कार्यक्रम बघण्याकरिता महिलांनी एकच गर्दी केली होती. यात ब्रह्मपुरी शहरासह परिसरातील बहुसंख्य महिला स्पर्धकांनी भाग घेऊन प्रश्नावलींची अचूक उत्तरे देणाऱ्या विजेता स्पर्धकांना पैठणी देऊन गौरविण्यात आले.



