चंद्रपुर जिल्हा

उश्राळमेंढा येथील ४ सोलर स्ट्रीट लाईटची चोरी

नागभीड तालुक्यातील
ऊश्राळमेंढा येथील सयुक्त
वनव्यवस्थापन समीतीच्या
माध्यमातुन तळोधी बा.
वनविभागाचे मार्गदर्शनात वाघाचा
बंदोबस्त होण्याचे दृष्टीने २० सोलर
स्ट्रीट लाईट लावण्यात आले होते.
परंतु नुकतेच चोरट्यांनी
त्यातील ४ सोलर लाईट चोरून
नेले. ऊश्राळमेंढा येथे वनविभा
गाकडुन संयुक्त वनव्यव स्थापन
समीतीला ग्राम विकासासाठी
जवळपास २५ लाख रुपयाचा निधी
मंजुर झाला. त्यात समीतीने गावात
असलेली वाघाची दहशत असल्याने
त्यावर नियंत्रन ठेवण्याकरीता
मोक्याच्या ठिकानी व आवश्यक
ठिकाणी सोलर लाईट लावण्याचे
ाqनयोजन करण्यात आले. परंतु
नुकतेच लावलेल्या पैकी ४.लाईट
ची चोरी अज्ञात व्यक्तीने केली त्यात
वाढोणा रोडवरील ३.लाईट तर
स्मशान भुमी जवळील १ असे
गावाबाहेरील ४ ही लाईट चोरून
नेले. सोलर लाईट नुकतेच लावले
असल्याने अजुनपर्यंत ग्रा.प.कडे
सुपुर्द झालेले नाही. ते अजुनही
संयुक्त वनव्यवस्थापन समीती कडेच
आहे. त्यामुळे संबंधीतांनी तळोधी
बा. पोलीस स्टेशन व वनपरीक्षेत्र
अधीकारी तळोधी बा.यांचे कडे
तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यावेळी हेमंत लांजेवार सरपंच
ऊश्राळमेंढा तथा अध्यक्ष सरपंच
संघटना चंद्रपुर जिल्हा, जयेश लोंढे
ऊपसरपंच ऊश्राळमेंढा, कुळमेथे
वनरक्षक, नेवारे ग्रा.प. सदस्य हजर
होते.

Leave a Reply

Your email address will not be published.